रत्नमाला गायकवाड यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार
पंढरपूर/ प्रतिनीधी
भारत सरकार मान्यता प्राप्त असलेल्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय
विस्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघाचे वतीने
देण्यात आलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार श्रीमती रत्नमाला गायकवाड (जाधव) यांना सोलापूर येथे रविवारी प्रदान करण्यात आला.
रत्नमाला गायकवाड या
मा. शरदचंद्रजी पवार शिक्षण प्रसारक मंडळ पळशी यांच्या खिलारवाडी येथील विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
हा राज्यस्तरीय पुरस्कार रविवारी सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशाला याठिकाणी श्रीमती रत्नमाला जाधव यांनी स्वीकारला. यावेळी
राष्ट्रीय विश्वस्त आणि शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ,संपूर्ण भारत कार्यक्षेत्र राष्ट्रीय विश्वस्त आणि शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष दत्तात्रय काळे, संजय घोडके, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव अजित चव्हाण, खिलारवाडी विद्यालय खिलारवाडी चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारला व सर्वांनी रत्नमाला गायकवाड यांचे अभिनंदन केले.
माननीय श्रीमती रत्नमाला गायकवाड या सिद्धेवाडी तालुका पंढरपूर गावचा सुनबाई आहेत व पंढरपूर येथील कन्या आहेत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा