Breaking

रविवार, २३ ऑक्टोबर, २०२२

दूध संस्थेतर्फे बोनस म्हणून 51 दूध उत्पादकांना 39 हजार रुपयांचे तेल आणि साखरेचे वाटप ....



दूध संस्थेतर्फे बोनस म्हणून 51 दूध उत्पादकांना 39 हजार रुपयांचे तेल आणि साखरेचे वाटप ....  


         
बेंबळे।प्रतिनिधी।                       
              हरीनगर -पांडववस्ती येथील जिजामाता महिला दूध उत्पादक संस्थेच्या वतीने दूध पुरवठा करणाऱ्या ५१ शेतकऱ्यांना दीपावली निमित्त बोनस म्हणून 39 हजार रुपयाचे तेल व साखरेचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन प्रफुल्लता दिगंबर भोसले यांनी दिली आहे.
        वृत्तांत असा की भोसलेवाडी( बेंबळे) परिसरातील हरीनगर- पांडव वस्ती येथे 1997 साली जिजामाता महिला  दूध संस्थेची स्थापना करण्यात आली . संस्थेच्या अध्यक्ष म्हणून प्रफुल्लता दिगंबर भोसले तर सचिव म्हणून दिगंबर सौदागर भोसले काम पाहतात .याप्रसंगी संस्थेचे सचिव दिगंबर भोसले म्हणाले की या ठिकाणी पहिल्यापासूनच 50 ते 55 शेतकरी संस्थेस दूध पुरवठा करतात, सध्या दोन्ही वेळेस एकूण १३०० लिटर दूध संकलन होते .गाईच्या दुधाला 34 ते 35 रुपये तर म्हशीच्या दुधाला 45 ते 50 रुपये प्रति लिटर दर दिला जातो. सर्व व्यवहार पारदर्शी असून ऑनलाईन वरून एकूण हिशोबाची प्रिंट निघताच विभागून प्रत्येकास दहा दिवसाचे बिल अकराव्या दिवशी दिले जाते .तसेच गाई -म्हशी घेण्यासाठी दूध उत्पादकांना संस्थेने सध्या 33 लाख रुपयांचे बिगरव्याची ऍडव्हान्स वाटप केले आहे. पशुखाद्य, चारा वैरण व इतर किरकोळ मदतीसाठीही संस्था नेहमीचा तत्पर असते तसेच दूध उत्पादक सभासदास दवाखाना, शिक्षण, किंवा लग्न किंवा कोणत्याही अडचणीच्या वेळी संस्थेतर्फे बिनव्याजी रक्कम ऍडव्हान्स म्हणून दिली जाते. प्रत्येक वर्षी दिपवाळीनिमित्त पैशाच्या स्वरूपात दूध उत्पादकांना बोनस दिला जातो परंतु या वर्षी प्रत्येक व्यक्तीस पाच लिटर तेलाचा ड्रम व पाच किलो साखर बोनस म्हणून देण्यात आली. 51 दुध उत्पादकांना एकूण 39 हजार रुपयाचे तेल व साखर वाटप करण्यात आले. पारदर्शी व्यवहार व भरीव मदत या विश्वासावरच  संस्थेची दिवसेंनदिवस प्रगती होत असल्याचे मत चेअरमन प्रफुल्लता भोसले यांनी व्यक्त केले. 

     दूध उत्पादकांना तेल व साखर वाटप प्रसंगी प्राध्यापक बबनराव भोसले माजी ग्रामपंचायत सदस्य रत्नदीप भोसले ,नितीन भोसले, सहकारी सोसायटीचे सचिव अशोक भोसले, महादेव भोसले, श्रीमंत भोसले, अमोल भोसले ,सचिन गायकवाड ,नागेश भोसले, रामभाऊ लोंढे व नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा