*राष्ट्रीय*समाज* *पक्ष्याच्या* *जिल्हाध्यक्ष* *पदी* *घोडके* *यांची* *निवड*
मौजे लोहगाव ता. तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय घोडके हे नेहमी गोरगरीब लोकाच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे आंदोलन व मोर्च्याच्या माध्यमातून नेहमी जिल्ह्यात चर्चेत ठिकाणी कळंब,उस्मानाबाद, तुळजापुर, लोहारा, उमरगा विधानसभा बूथ मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते राज्य कार्यकारणी सदस्य डॉक्टर शेंडगे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, यावेळी अश्रूबा कोळेकर साहेब महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य, विष्णू गोरे मराठवाडा अध्यक्ष, रघुनाथ वाघमोडे मराठवाडा संघटक, जिल्हाध्यक्ष ॲड. विकास पाटील, सुहासिनी पाटील मॅडम महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, विनोद कुलकर्णी जिल्हा उपाध्यक्ष, पांडुरंग लोकरे कळंब तालुका अध्यक्ष,सचिन देवकते उस्मानाबाद ता अध्यक्ष,रंगराव देवकर लोहारा तालुका अध्यक्ष, नंदकुमार मोटे जिल्हा कार्यकारिणी सदस्य, बाळासाहेब पाटील,बालाजी फडताळे,सह ईतर कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी संजय घोडके (उस्मानाबाद, तुळजापुर, लोहारा, उमरगा )यांची नियुक्ती करण्यात आली संजय घोडके साहेब यांनी राष्ट्रीय समाज पक्ष उस्मानाबाद जिल्ह्यात तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहे असे आश्वासन दिले यावेळी उस्मानाबाद महिला तालुका अध्यक्ष पदी मुंडे ताई याची निवड करण्यात आली तसेच उस्मानाबाद शहराध्यक्ष पदी सुळ मॅडम यांची नियुक्ती करण्यात आली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा