Breaking

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

पोलिस स्टेशन प्रभारी यांचेसह पोलिस नाईक यांचेवर कारवाईसाठी शेतकऱ्याची उच्च न्यायालयात धाव




पोलिस स्टेशन प्रभारी यांचेसह पोलिस नाईक यांचेवर कारवाईसाठी शेतकऱ्याची उच्च न्यायालयात धाव


****************Aj24Taas News Network***** कुर्डूवाडी प्रतिनिधी अरुण कोरे यास कडून*****

*गुन्हे नोंदविण्यास सातत्याने टाळाटाळ...अधिक्षकांकडे धाव घेतल्यावरच दखल...*
****************************************
   *कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या कारभाराबाबत प्रश्न चिन्ह...*
***************************************
   *पोलिस निरीक्षकाविना पोलिस स्टेशन पोरके...अवैध धंदेवाल्यांची चांदी...*
******************************************
कुर्डुवाडी : लऊळ ता.माढा येथील बाजारातुन शेतकऱ्याच्या चोरीला गेलेल्या मोबाईल फोनच्या एप मधून पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे व पोलिस नाईक बाळासाहेब दाढे यांच्या हलगर्जीपणा मुळे १ लाख ०७ हजार ६०२ रुपये चोरट्याने काढून घेतल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी दोघांच्याविरुद्ध पीडित शेतकऱ्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.

लऊळ येथील शेतकरी महादेव अजिनाथ भोंग या शेतकऱ्याचा रविवार दि.१४ ऑगस्ट रोजी सकाळी ०९.०० वाजता लऊळ येथील आठवडी बाजारातुन मोबाईल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेला होता.फोन चोरीला गेल्याचे लक्षात येताच कुर्डुवाडी पोलिस स्टेशन येथे चोरीची तक्रार देण्यास गेला होता.कुर्डुवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करत बोधे यांनी चोरीची फिर्याद घेण्याऐवजी त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या ठाणे अंमलदार पोलिस नाईक बाळासाहेब दाढे यांना मोबाईलचा गहाळ दाखला देण्यास सांगितला. 

गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केल्याने झालेल्या नुकसानीची दाद मागण्यासाठी पोलीस मुख्यालय दाद मागीतली यावर वरिष्ठांच्या आदेशानंतरही  दि.१७ ऑगस्ट रोजी केवळ तक्रारी अर्जावर पोहोच देण्याशिवाय फिर्याद दाखल करण्यास पुन्हा टाळाटाळ केली.शेवटी १९ रोजी फिर्याद दाखल करून घेण्यात आली.परंतु वेळेत तक्रार दाखल करून सायबर विभागाला कळविले असते तर रक्कम वाचवू शकलो असतो असे सायबर विभागाकडून स्पष्ट केल्यानंतर भोंग यांनी उच्च न्यायालयात अॅड. हरिश्चंद्र कांबळे यांचेमार्फत याचिका दाखल करुन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करुन खातेनिहाय चौकशी करण्यावाबत तसेच नुकसान भरपाई मिळणेकरीता मागणी केलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा