Breaking

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०२२

श्री गणपती फार्मसी महाविद्यालयाची विद्यार्थीनी राज्यात पहिली*


*श्री गणपती फार्मसी महाविद्यालयाची विद्यार्थीनी राज्यात पहिली*



    अकोले खुर्द, तालुका माढा येथील श्री गणपती इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, टेंभूर्णी या महाविद्यालयातील द्वितीय वर्ष डी फार्मसी ची विद्यार्थिनी तेजस्विनी मिस्किन यांनी राज्यस्तरीय इ-पोस्टर प्रेसेंटेशन कॉम्पिटिशन मध्ये टी.बी.बद्दल जागरुकता या विषयावर सादरीकरण करुन प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी दिली.यासाठी विद्यार्थिनीला महाविद्यालयातील प्रा. केतकी पाटील,प्रा.कोमल यादव, प्रा. मोनिका माळी, प्रा. रूपाली राऊत, प्रा. दिव्या ओस्तवाल, प्रा. प्राची पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभले. 
     जिजामाता कॉलेज ऑफ फार्मसीने, सराटी यांनी स्टेट लेवल इ-पोस्टर प्रेसेंटशन कॉम्पेटिशन चे आयोजन केले होते. यामध्ये राज्यभरातून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये श्री गणपती फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य पातळी वर प्रथम  क्रमांक मिळवला याबद्दल अभिमान असल्याचे गौरवपूर्ण उद्गार संस्थेचे सचिव डॉ. आर.डी. बेंदगुडे यांनी केले. यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
    यावेळी श्री गणपती फार्मसी चे अध्यक्ष अॕड. विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे व सर्व प्राध्यापक वर्गांनी यशस्वी विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा