*युवकांनी व्यवसायाकडे वळावे - आ बबनदादा शिंदे*
टेंभुर्णी ( प्रतिनिधी)
आज टेंभुर्णी मार्केट यार्ड येथे चव्हाणवाडीचे ज्ञानेश्वर मिस्कीन यांच्या सुदेश लाईट हाऊस या दुकानाचे दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्घाटन करताना आमदार बबनदादा बोलत होते. ते म्हणाले की आज सर्व युवकांनी नोकरीच्या कोणत्याही अशा न ठेवता आपापल्या उद्योगाकडे वळले पाहिजे. तरी खूप चांगल्या प्रकारची क्रांती आजचे युवक शंभर टक्के समाज घडवू शकतील. त्याचबरोबर युवकांनी आपले वाचन वाढवले पाहिजे. स्पर्धा परीक्षावर भर दिला पाहिजे. व नवीन व्यवसायास शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारचे विचारही यावेळेस त्यांनी व्यक्त केले. पुढे म्हणाले म्हणून युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाची योग्य अशी निवड करावी व आपले पुढील भविष्य घडवण्याच्या दृष्टीने आतापासूनच विचार करायला हवा.
यावेळी अशोक मिस्कीन, कैलास चव्हाण, हनुमंत चव्हाण, नवनाथ शिंदे, सुनील मिस्किन, संजय मिस्कीन,अंकुश सलगर,नरहरी नांगरे, संतोष जाधव, सचिन चव्हाण, सुभाष चव्हाण, सुभाष इंदलकर पाटील ,राहुल चव्हाण,नितीन चव्हाण, विष्णू भोसले, नागनाथ चव्हाण, सौदागर भोसले, सुनील भोसले,भारत जगताप, विजय कदम, समाधान मिस्किन, तुकाराम चव्हाण, नामदेव चव्हाण, गणेश चव्हाण, प्रदीप खडके, सागर पवार, ज्ञानेश्वर मिस्किन, सुरज मिस्किन याचबरोबर अनेक चव्हाणवाडी व टेंभुर्णी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा