जिल्हा रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक भाबड यांचा सत्कार...प्रहारअपंग अध्यक्ष-राजेंद्र पोकळेंचा पुढाकार....
श्रीगोंदा-नितीन रोही,
सविस्तर असे की
दिनांक १४/०९/२०२२ रोजी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या पटांगणामध्ये दोन मोटार सायकल चोर पकडून तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या बद्दल सुरक्षा अधिकारी देवेंद्र भाबड तसेच सर्व सहकारी सुरक्षा रक्षक यांचा अहमदनगर शहराच्या महापौर रोहिणी शेंडगे, अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक संजय घोगरे , वैद्यकीय अधिकारी मनोज घुगे,अधीसेविका जिल्हा रुग्णालय छाया जाधव,राज्य अध्यक्ष महाराष्ट्र आरोग्य सेवा परिचारिका संघटना सुरेखा आंधळे , प्रहार अपंग संघटना जिल्हाध्यक्ष लक्षीमन पोकळे, तालुका अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्रहार अपंग संघटनेचे शहर उपाध्यक्ष संदेश रपारीया,विजय हजारे,विजय हजारे,सरला मोहोळकर,अरविंद नरसाळे, मधुकर गाडगे,हमीद शेख,किशोर सूर्यवंशी,आप्पासाहेब ढोकणे यांच्या सह रुग्णालयाचे कर्मचारी,पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.तसेच यापुढे भविष्यातही सुरक्षा रक्षकांनी अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी आशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा