Breaking

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

खटाव माण अँग्रोचा चौथा गळीत हंगामाचा शुभारंभमान्यवरांच्या हस्ते होणार पहिल्या ऊसमोळीचे पूजन



खटाव माण अँग्रोचा चौथा गळीत हंगामाचा शुभारंभ
मान्यवरांच्या हस्ते होणार पहिल्या ऊसमोळीचे पूजन
 


वडूज प्रतिनिधी / शरद कदम


            पडळ येथील खटाव माण अँग्रो साखर कारखान्याचा सन २०२२-२३ या चौथ्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार दि.११ रोजी सकाळी १० वाजता दि- कराड अर्बन को-ऑफ बँकेचे कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांच्या शुभहस्ते तसेच कारखान्याचे चेअरमन, मा.आमदार जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे व कराड उत्तर मतदारसंघाचे नेते, को- चेअरमन मनोजदादा घोरपडे आणि कार्यकारी संचालक संग्रामबापू घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊसमोळी टाकण्याचा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याच्या संचालिका प्रीती घार्गे व संचालक विक्रम घोरपडे यांनी दिली.
             कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या कारखान्याच्या चौथ्या  गळीत हंगामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते ऊस मोळी टाकून होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असणाऱ्या या कारखान्याच्या बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रम गत आठवड्यात संपन्न झाला असून सध्या गळीतासाठी पूर्ण क्षमतेने सज्ज झाला आहे. कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे व सौ इंदिराताई घार्गे या उभयतांच्या हस्ते कारखान्याच्या कार्यस्थळी सत्यनारायण महापूजा बांधण्यात येणार आहे. 
      सदर कार्यक्रमास दि कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, जनरल मॅनेजर गिरीश सिहासणे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळाची या कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहेत. चौथ्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, कर्मचारी यांनी उपस्थित राहवे असे आवाहन करण्यात आले आहे. 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा