Breaking

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील दिवेगव्हाण येथील राजरोसपणे अवैध दारू विक्री बंद होण्यासाठी ग्रामस्थांनी दिले करमाळा पोलिसांना दीडशे सह्यांचे निवेदन


करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील दिवेगव्हाण येथील राजरोसपणे अवैध दारू विक्री बंद होण्यासाठी ग्रामस्थांनी दिले करमाळा पोलिसांना दीडशे सह्यांचे निवेदन 





करमाळा प्रतिनिधी 

दिवेगव्हाण येथील राजरोसपणे चालू असणारी अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिवेगव्हाण येथील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे निवेदनावर दिवेगव्हाण येथील दीडशे ग्रामस्थांच्या सह्या आहेत
दिवेगव्हाण येथील ग्रामस्थांनी माननीय पोलीस अधीक्षक ग्रामीण सोलापूर जिल्हा यांना पाठवलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की दिवेगव्हाण येथे राजरोसपणे हवेत दारू विक्री जोरदारपणे चालू असून याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील दिवेगव्हाण हे गाव सांप्रदायिक वारसा जपणारे असून गेली अनेक वर्षापासून आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचे दखलपात्र गुन्हे घडलेले नव्हते परंतु गेली एक ते दीड वर्षापासून गावातील काही तरुण हे केतुर व कोर्टी तसेच शेजारी ल अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथून देशी दारूचे बॉक्स मोठ्या प्रमाणात आणून गावामध्ये खुलेआम दारू विक्री करीत आहे सध्या ऊस तोडणीचा सीजन चालू असल्यामुळे आमच्या गावामध्ये मराठवाडा व विदर्भातील जवळपास 200 ते 250 ऊस मजूर तोडणी कामी आलेले आहेत सदरील गावातील तरुण हे दररोज या ऊसतोड मजुरांना बेकायदेशीरपणे दारू विक्री करतात व त्यामुळे आमच्या गावातील देखील कित्येक तरुण हे दारूच्या व्यसनाधीन झालेले आहेत त्यामुळे बरेच जणांचे संसार देखील मोडलेले आहे अशा परिस्थितीत आम्ही यापूर्वी देखील आपणाकडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत वारंवार तक्रारी करून देखील गावातील अवैध दारू विक्री बंद झालेली नाही त्यामुळे गावामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे असे निवेदनात म्हटले आहे

तरी सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सौ  तेजस्वी सातपुते मॅडम यांनी व्यक्तिशः या प्रकाराकडे दखल देऊन संबंधित राजरोसपणे चालू असणारे अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी संबंधित करमाळा पोलीस स्टेशनला आदेश द्यावा अशी मागणी दिवेगव्हाण येथील ग्रामस्थांनी निवेदनाच्या शेवटी केली आहे निवेदनाच्या प्रती अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधीक्षक करमाळा, आदिना पाठविल्या आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा