Breaking

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याचा पहिला हप्ता 2300 रुपये जाहीर - आमदार संजयमामा शिंदे.



विठ्ठल कार्पोरेशन साखर कारखान्याचा पहिला हप्ता 2300 रुपये जाहीर - आमदार संजयमामा शिंदे.


कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )

विठ्ठल कार्पोरेशन लि.,म्हैसगांव तालुका माढा येथील साखर कारखान्याचा सन 2022 - 23 हंगामा करिता गळितास येणाऱ्या उसाला  पहिला हप्ता प्रति टन 2300 रुपये अदा केले जातील , अशी माहिती विठ्ठल कार्पोरेशनचे चेअरमन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली .
        याशिवाय सर्व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी कोणत्याही वजन काट्यावर ऊस वजन करून आणावा व वजनामध्ये काही तफावत होत नसल्याची खात्री करून विठ्ठल कार्पोरेशन लि, म्हैसगांव  साखर कारखान्यास दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऊस गळितास देऊन सहकार्य करावे , असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे . यावेळी कार्यकारी संचालक यशवंत भैय्या शिंदे , मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार रणवरे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा