विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडून 2350 दर जाहीर..
शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा .
शेतकऱ्यांचा पहिला हप्ता खात्यावर जमा करणारा विठ्ठलराव शिंदे राज्यात एकमेव कारखाना.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम मध्ये गाळपासाठी आलेल्या उसासाठी पहिला हप्ता 2350 रुपये दर जाहीर केला असून , हि रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती , कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी दिली . सन 2022 - 23 या सुरू असलेल्या गळित हंगामात शेतकऱ्यांना पहिला उसाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणारा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा दर दहा दिवसाला उसाचे पेमेंट काढणार असल्याचेही कारखान्याचे चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांनी या अगोदर जाहीर केले आहे . त्यानुसार २० ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या पंधरवड्यातील उसाचे बिल २३५० रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने उसाचा पहिला हप्ता 2350 रुपयाने जाहीर केला असून अंतिम दर किती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा