“ भिक्षा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.”
प्रतिनिधी रुपेश डोलारे धाराशिव
तुळजापूर पोलीस ठाणे : डिकमल पारधी पिढी येथील- गोरख काळे, सुमन काळे, शहाजी काळे, कोंडाबाई पवार, कोंडाबाई काळे व तुळजापूर येथील- उमाबाई शिंदे या सर्वांनी दि. 07.11.2022 रोजी 12.00 वा. सु. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर महाद्वारासमोर त्यांच्या 6 ते 12 वयोगाटातील बालकांना येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांकडून भिक मागण्यास प्रोत्साहन देउन त्यांना भिक मागण्यासाठी प्रवृत्त केले. यावरुन विस्तार अधिकारी, तुळजापूर- श्री. नागेश वाकडे यांनी दि. 25.11.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द बालकाची काळजी व संरक्षण अधिकनियम कलम- 76 व महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधक अधिनियम कलम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा