Breaking

रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२

श्रीराम विद्यालयात संविधान दिन साजरा*



*श्रीराम विद्यालयात संविधान दिन साजरा* 




*लातूर प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर सूर्यवंशी*
 एरंडी -सारोळा-श्रीराम माध्यमिक विद्यालय एरंडी -सारोळा ता.औसा जि. लातूर येथे भारतीय संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,पंडित जवाहरलाल नेहरू व राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक अविनाश जाधव सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी संविधानाचे सामूहिक वाचन केले. श्री. सावंत सर यांनी भारतीय संविधानाविषयी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्वे मूलभूत अधिकार व कर्तव्य या विषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली या कार्यक्रमास श्री. कदम सर, सूर्यवंशी सर, काजळे सर, श्रीमती, सुतार मॅडम,शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा