मंगरूळ येथील संत गाडगेबाबा आश्रमशाळेमध्ये संविधान दिन साजरा
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी संत गाडगेबाबा आश्रम शाळा मंगरूळ तालुका तुळजापूर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रम दोन सत्रा मध्ये वेगवेगळ्या प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी उत्साहात पार पडला. सकाळच्या सत्रामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक म्हणून शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय श्री लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब यानी प्रतिमा पूजन केले.तसेच आदरणीय ढोबळे साहेबांचे मार्गदर्शन लाभले, यामध्ये त्यांनी समता बंधुता न्याय आणि निरपेक्षता या संविधानाशी निगडित असणाऱ्या विषयावरती मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षिका श्रीमती घोडके मॅडम यांनी संविधान प्रस्ताविका याचे सामूहिक वाचन करून घेतले. अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक श्री कोरे सर आणि सूत्रसंचालन श्रीमती वैद्य मॅडम यांनी केले कार्यक्रमासाठी कर्मचारी श्री बनसोडे व श्रीमती भोसले व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले
दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमासाठी उद्योजक तथा बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री रमेश तात्या गालफाडे अध्यक्ष म्हणून लाभले व एडवोकेट श्री ढवळे साहेब व सहकारी वकील प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. प्रतिमापुजनानंतर श्री गालफाडे तात्यांचा सत्कार मुअ श्री कोरे सर यांनी केले व श्री ढवळे साहेब यांचा सत्कार मु अ श्री क्षीरसागर सर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश तात्या गालफडे यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना संबोधित करत संविधानाचे महत्त्व समजावून दिले.शाळा
प्रशासनास,आश्रमशाळेतील विद्यार्थी किंवा संबधित इतर कसल्याही अडचणीच्या वेळी सहकार्य करण्याचे वचन श्री रमेशतात्या गालफाडे यांनी दिले . यावेळी प्रमुख पाहुणे यांचेही मार्गदर्शन मिळाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वैद्य मॅडम यांनी केले.दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक मदने सर, जाधव सर, चव्हाण सर,गवळी सर भोसले सर,मेरत सर,पाटील सर व कर्मचारी गवळी एस, पाटील सचिन, पवार आर. यांनीही मोलाचे सहकार्य केले.तसेच श्री गिरासे सर व श्रीमती दत्तू मॅडम यांचेही सहकार्य लाभले. या सत्रामध्ये आदरणीय श्री रमेश तात्या गालफाडे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून केळी वाटप केली. तसेच संविधान या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली व अनेक चिमुकल्यांनी संविधानाविषयी विचार व्यक्त केली.यावेळी अनेक तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा