Breaking

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०२२

आम आदमी पार्टी युवा आघाडी सोलापूर जिल्हा सचिव पदी योगेश शिंदे तर टेंभुर्णी शहर उपाध्यक्ष पदी सागर पाटील यांची निवड*



*आम आदमी पार्टी  युवा आघाडी सोलापूर जिल्हा सचिव पदी योगेश शिंदे तर टेंभुर्णी शहर उपाध्यक्ष पदी  सागर पाटील यांची निवड*


आज टेंभुर्णी मध्ये तरुण परिवाराचा संकल्प मेळावा पार पाडला,त्यावेळी आम आदमी पार्टी युवा आघाडी जिल्हा सचिव पदी योगेश शिंदे व टेंभूर्णी शहर युवा आघाडी उपाध्यक्ष पदी सागर पाटील यांची निवड करण्यात आली. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी तरुण पिढी नक्कीच समोर येऊन आप सोबत काम करेन असा संकल्प या वेळी केला ...आगामी काळात होणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन  आम आदमी पार्टीचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अरविंद केजरीवाल यांचे विकासाचे राजकारण पुढे घेऊन जाण्यासाठी तरुण पिढी पुढं सरकत आहे . त्यामुळे सर्व युवक एकत्रित येऊन सोलापूर मध्ये नक्कीच बदल घडवून आणतील असा विश्वास आम आदमी पार्टीचे युवा आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष गगन गोडसे सर यांनी व्यक्त केला. आम आदमी पार्टीमध्ये लोकांना काम करण्यासाठी भरपूर संधी असल्याने युवक वर्ग आप कडे आकर्षित होत आहे.  योगेश शिंदे हे तरुण सुशिक्षित असून युवा वर्गाचे नक्कीच चांगल्या पद्धतीने नेतृत्व करतील . सागर पाटील यांच्या जनसंपर्काचा पार्टील नक्कीच फायदा होईल . आम आदमी पार्टीचा प्रचार,प्रसार करण्यासाठी  कटिबद्ध असल्याचे योगेश शिंदे व सागर पाटील यांनी सांगितले.  या कार्यक्रमावेळी आम आदमी पार्टी युवा आघाडी  सोलापूरचे जिल्हाध्यक्ष गगन गोडसे सर,  माढा तालुका सचिव अनंत घळके सर, माढा तालुका उपाध्यक्ष सतीश लोंढे, दक्षिण सोलापूर सचिव विनायक पवार , सर्व शाखा पदाधिकारी व असंख्य स्वरूपात सर्व मित्र परिवार उपस्थित होता. यावेळी अनेक तरुणांनी आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला. योगेश सरांचे हार्दिक अभिनंदन व पुढील राजकीय कारकिर्दी साठी शुभेच्छा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा