Breaking

गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

करमाळा तालुका साहित्य मंडळाचा सन 2021 व 22 चा बुधभूषण काव्य पुरस्कार कवी पुनीत मातकर यांच्या काव्यसंग्रहास जाहीर काव्य पुरस्काराचा सोहळा येत्या 25 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रारंगांत करमाळा येथे होणार


करमाळा तालुका साहित्य मंडळाचा सन 2021 व 22 चा बुधभूषण काव्य पुरस्कार कवी पुनीत मातकर यांच्या काव्यसंग्रहास जाहीर काव्य पुरस्काराचा सोहळा येत्या 25 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रारंगांत करमाळा येथे होणार 


करमाळा प्रतिनिधी
 करमाळा तालुका साहित्य मंडळ,करमाळा यांच्या वतीने दिला जाणारा २०२१-२०२२ चा "बूधभूषण काव्य पुरस्कार" कवी पुनीत मातकर यांच्या ''ऐन विणीच्या हंगामात" या काव्यसंग्रहास देण्यात येणार आहे.
हा सोहळा रविवार, दिनांक २५/१२/२०२२ रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे संपन्न होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील ,प्रमुख पाहुणे संगीतकार/ सिनेपार्श्वगायक/लोककवी प्रशांत मोरे तर सुप्रसिद्ध कवी प्रा.डॉ. सुरेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप
"ग्रंथ दिंडी" सकाळी ९:३० ते ११:००
"गझल मुशायरा व स्थानिक आणि महाविद्यालयीन कवी कवयित्री यांचे कवी संमेलन ११:०० ते १:०० 
करमाळा तालुका साहित्य मंडळ आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालया यांच्या संयुक्त विद्यमाने होईल.
स्नेह भोजन दुपारी १:०० ते २:०० यावेळेत होईल.
व सायंकाळी ठीक ५:०० वा. "बूधभूषण काव्य पुरस्कार" वितरणाचा सोहळा पार पडेल.
तरी या सोहळ्यास काव्य रसिक आणि साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन  करमाळा तालुका मंडळाचे अध्यक्ष कवी प्रकाश (तात्या) लावंड , उपाध्यक्ष प्रा. नागेश माने, सचिव दीपक लांडगे, प्रसिद्धी प्रमुख कवी खलील शेख, सल्लागार विवेक येवले,खजिनदार डॉ.सौ.सुनिता दोशी,गझलकार नवनाथ खरात यांनी केले आहे.
करमाळा तालुका साहित्य मंडळाच्या वतीने सदरचा साहित्यिक कार्यक्रम प्रथमतः च करमाळा शहरात होत असल्याने साहित्यिक रसिकांना सदरचा कार्यक्रम पाहण्यासाठी एक प्रकारची मेजवानी मिळणार असल्याची माहिती प्रसिद्ध कवी खलील शेख यांनी पत्रकाराशी बोलताना माहिती दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा