Breaking

गुरुवार, १५ डिसेंबर, २०२२

शिवशंभो कुस्ती संकुल जेऊरवाडी येथील मल्लांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश* तालुक्यामध्ये सर्वत्र होत आहे कौतुक



*शिवशंभो कुस्ती संकुल जेऊरवाडी येथील मल्लांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश* तालुक्यामध्ये सर्वत्र होत आहे कौतुक


करमाळा प्रतिनिधी 
दिनांक 10 11 12 रोजी स्थळ खडूस, तालुका माळशिरस येथे झालेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत जेऊरवाडी येथील शिवशंभो कुस्ती संकुल मधील मल्ल यांनी चार  सुवर्ण व एक रोप्य पदक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले 
1] उत्कर्ष भिसे-48 किलो वजनी गटात 14 वर्षखालील सुवर्णपदक
2] सुजित हजारे -५५ किलो वजनी गटात 17 वर्षाखालील सुवर्णपदक
3] किरण मुटेकर- 71 किलो वजनी गटात 17 वर्षाखालील सुवर्णपदक
4] संकेत शिंदे -८२ किलो वजनी गटात 19 वर्षाखालील सुवर्णपदक
5] पृथ्वीराज घोगरे -71 किलो वजनी गटात 17 वर्षाखालील  रौप्य पदक मिळाले
या मल्लांना महाराष्ट्र केसरी चंद्रहास (बापू )निमगिरे व वस्ताद श्रावण कळेल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि तुळशीदास निमगिरे, अण्णासाहेब निमगिरे, सोमनाथ हजारे,किसन करचे, नितीन निमगिरे, दीपक निमगिरे ,गणेश मुटेकर यांचे सहकार्य लाभले 



चौकट घेणे
शिवशंभो कुस्ती संकुलात 50 मल्ल रोज सकाळी आणि संध्याकाळी त्यांचं सराव घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो. आत्याधुनिक पद्धतीची व्यायाम शाळा असून इथे जिम मॅट व मातीचा आखाडा आहे आणि राहण्याची सोय मोफत केली जाते मी हालाकीच्या परिस्थितीतून महाराष्ट्र केसरी झालो त्याची जाणीव ठेवून गरीब मुलांना मार्गदर्शन व इतर मदतही करत आहे

मा चंद्रहास बापू निमगिरे महाराष्ट्र केसरी,
 जेऊरवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा