Breaking

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

माढा तालुक्यात डी व बी फार्मसी कॉलेजला मंजुरी- रणजितसिंह शिंदेशैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू



माढा तालुक्यात डी व बी फार्मसी कॉलेजला मंजुरी- रणजितसिंह शिंदे
शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची  प्रवेश प्रक्रिया सुरू



टेंभुर्णी/प्रतिनिधी 
तालुक्यातील माढा शहरात विठ्ठल प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसी आणि टेंभुर्णी येथे आर्या कॉलेज ऑफ फार्मसी अशा दोन औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाची नुकतीच मंजुरी मिळाली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.


माढा शहरात नव्याने सुरू होणा-या डिप्लोमा (डी
 फॉर्म)  व डिग्रीसाठी (बी.फॉर्म) प्रत्येकी ६० जागा तर टेंभुर्णी येथे डी. फार्मसीसाठी ६०  जागांना मंजुरी मिळाली आहे.  
मागील अनेक वर्षापासून माढा तालुक्यात व्यावसायिक तसेच रोजगाराभिमुख शिक्षण सुरू करण्याची मागणी शिक्षणप्रेमी नागरिकांमधून सातत्याने होत होती. यानिमित्ताने शिंदे कुटुंबियांकडून त्याची पूर्तता होत आहे. माढा तालुका आणि आसपासच्या तालुक्याच्या  ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना किफायतशीर व दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच  व्यावसायिक व तंत्रशिक्षणाची गरज पूर्ण होण्याच्या उद्देशाने ही नवीन महाविद्यालये सुरू केली असल्याचे प्रतिपादन रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे. आणखीही भविष्यात शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने वाटचाल करणार असल्याचेही सूचन त्यांनी केले.
 या दोन्ही महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विठ्ठल प्रतिष्ठान कॉलेज ऑफ फार्मसी माढा या  कॉलेजचा PCI CODE- 4601 तर DTE CODE- 6981 असून D. - B.PHARM साठी - चॉईस कोड 698182310 हा आहे. तर आर्या कॉलेज ऑफ फार्मसी टेंभुर्णीचा PCI CODE- 4662 आणि DTE CODE- 6978 असून  697882310 हा चॉईस कोड असून येणाऱ्या ऑनलाईन कॅप राउण्डमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेशाची नोंद करावी, असे आवाहन दोन्ही महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.
फोटो ओळी-  रणजितसिंह शिंदे, 
चेअरमन, सोलापूर जिल्हा दूध संघ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा