Breaking

बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

गाव कायम विकासापासून वंचितच


गाव कायम विकासापासून वंचितच


लोहा प्रतिनिधी

लोहा : तालुक्यातील उमरा ग्रामस्थांनी विकास होत नसल्याने जुन्यांना कंटाळून नवीन नवयुवक पॅनलला निवडून देऊनही जवळपास चार महिन्याचा कालावधी लोटला असून अद्याप पर्यंत त्यांच्याकडूनही गावातील कोणत्याही कामाला सुरुवात होतांना दिसत नाही,निवडून येण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी दाखविलेल्या आश्वासनाची अद्याप पर्यंत एकही पूर्तता होताना दिसत नाही.गावातील समस्या तशाच ताटकळत आहेत. गावातील मुख्य रस्ते,नाल्या, स्वच्छालय हे कामे करणे अपेक्षित असूनही त्याकडे मात्र ग्रामपंचायतचे दुर्लक्षच होताना दिसत आहे.ज्यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा होत्या,त्यांना निवडून देऊन गावाने चूकच केली की काय,अशा संत्रप्त भावना नागरिकांतून ऐकायला मिळत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा