Breaking

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०२२

पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेजच्या अविराज सुळे याचा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत दुसरा क्रमांक



पिलीव येथील  कर्मवीर भाऊराव पाटील  व रमेश  खलीपे ज्युनिअर कॉलेजच्या  अविराज सुळे याचा  तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत  दुसरा  क्रमांक      



                     पिलीव प्रतिनिधी-  माळशिरस तालुक्यातील  पिलीव येथील  कर्मवीर भाऊराव पाटील  व रमेश  खलीपे ज्युनिअर कॉलेजच्या  अविराज नागनाथ सुळे हयाने सोलापूर  जिल्हा  क्रिडा  कार्यालया  मार्फत  आयोजित करण्यात  आलेल्या  तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 19वर्षे  व 61 किलो वजन गटात फ्री स्टाईल  या प्रकारात  दुसरा  क्रमांक  संपादन केला. या कुस्ती  स्पर्धा  बागेचेवाडी येथील लोकनेते स्व पै दत्ता वाघमारे  बहुउद्देशीय संस्थेच्या  वतीने  संग्रामनगर येथील शिवनेरी तालीमच्या मैदानात आयोजित करण्यात आल्या होत्या. अविराज याच्या  हया यशाबद्दल  त्याला  प्रशस्तीपत्र व  ट्रॉपी देऊन गौरविण्यात आले. त्याच्या  हया यशाबद्दल आजोबा नारायण सुळे,चुलते वैभव सुळे प्राचार्य  कापसे  एस डी, ज्युनिअर कॉलेज  विभाग प्रमुख  पाटील  सर,स्थानिक  स्कूल  कमीटी यांच्या सह पिलीव परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडुन  अविराज हयाचे अभिनंदन व  कौतुक  होत आहे.   फोटो  - अविराज सुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा