गंगाखेड पोलिस निरीक्षक सुनिल माने यांचा पोलिस हक्क सरक्षक संघटनेकडुन पुष्पगुच्छ देऊन सत्कार.
अनेक संघटना स्थापन झाल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न घेऊन, न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन, उपोषण इत्यादी मार्गाने,राजकीय छत्रछायेखाली राहून आपले कार्य करीत आहेत,पण जनतेच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस, आपल्या कुटुंबाचा व नातेवाईकांचा विचार सोडून, आपल्या कार्यासाठी तत्परता ठेवणाऱ्या,महाराष्ट्रातील तमाम पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्या हक्कासाठी, वेळोवेळी पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी, कर्तव्य तत्पर असणारी, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटना असून, गंगाखेड येथिल पोलिस हक्क संरक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने, आज दिनांक ११डिसेबर रोजी, गंगाखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक,सुनिल माने यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून,अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे गंगाखेड तालुका प्रशिध्दी प्रमुख श्री राजकुमार मुंढे, यांनी संघटना विषयी थोडक्यात कार्य प्रणाली सांगितली, यावेळी गंगाखेड अध्यक्ष रोहिदास कदम,शहर प्रमुख सुग्रीव बेले,तालुका उपाध्यक्ष मालोजी मांगदरे,प्रसिध्दी प्रमुख राजकुमार मुंडे,तालुका संघटक सुधाकर चव्हाण,उध्दव चाटे इत्यादी पदाधिकारी उपस्थिती होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा