Breaking

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

सोलापूर जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष दादासाहेब मोकाशी यांना पितृशोक.


सोलापूर जिल्हा गुरव समाजाचे अध्यक्ष दादासाहेब मोकाशी यांना पितृशोक.        



                          टेंभुर्णी ( प्रतिनिधी) दि १० टेंभुर्णी भवानीनगर येथील भवानी मातेची पुजारी व गुरव समाजाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दादासाहेब मोकाशी यांचे वडील मधुकर नरहरी मोकाशी यांचे काल दिनांक ०९/१२/२०२२ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाची वार्ता टेंभुर्णी शहरभर पसरतात त्यांच्या निधनाबद्दल टेंभुर्णी शहरातील नागरिकांमधून शोक व्यक्त करण्यात आला. मधुकर मोकाशी हे टेंभुर्णी येथील भवानी मातेचे कायमचे पुजारी होते नवरात्रामध्ये भवानी मातेच्या पूजेची आणि नवरात्राची व्यवस्था ते चोखपणे बजावत असल्याने सर्व ट्रस्टी आणि टेंभुर्णीकरांच्या दृष्टीने त्यांच्याबद्दल अतिशय आदर होता मधुकर मोकाशी यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे तीन मुली पत्नी व परतुंडे असा मोठा परिवार आहे अंत्यविधी शनिवारी सकाळी ९ वाजता टेंभुर्णी येथील त्यांच्या शेतामध्ये करण्यात आला त्यांच्या निधनाने टेंभुर्णी व पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा