पै.धनश्री व भाग्यश्री फ़ंड या सख्ख्या बहिणींची चमकदार कामगिरी...
श्रीगोंदा:नितीन रोही,
सविस्तर असे की बहादूरगड (हरियाणा)येथे दिनांक 05 ते 06 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या ग्रॅंड प्रिक्स राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये श्रीगोंदा येथील भाग्यश्री पोर्ट अकॅडमी चे तुफानी महिला पैलवान सख्या बहिणी धनश्री फंड व भाग्यश्री फ़ंड यांनी आपापल्या गटात चमकदार कामगिरी करत आणि सगळ्यांचा आकर्षक बिंदू ठरल्या ५७ किलो वजन गटांमध्ये धनश्रीने सुवर्णपदकाची कमाई केली आणि तिचीच मोठी बहीण भाग्यश्रीने 59 किलो वजन गटात सिल्वर मेडल ची कमाई केली या दोन्ही भगिनींनी सर्व कुस्ती शौकीनानचे डोळ्याचे पार पडले सर्व महाराष्ट्रातून कुस्तीप्रेमी कडून या दोघी बहिणींचा शुभेच्छा चा वर्षाव होत आहे .दोन्हीही पैलवान धनश्री व भाग्यश्री या दोन्ही भगिनींनी आपल्या यशाचे सर्व श्रेय आपले कोच नवीन पुनिया समाधान सर प्रा संजय डफळ वडील हनुमंत फंड आणि तालमीला कायम सहकार्य करणारे हरिभाऊ काळे यांना दिले आहे. फंड भगिनींनी मेडल जिंकल्या मुळे नगर जिल्ह्यातील सर्व कुस्तीगीर व नागरिक यामध्ये आनंदाचे वातावरण आहे व त्या दोन्ही भगिनींना घडवणारे यांचे पालक मेजर हनुमंत फंड यांचे सर्वत्र कौतुक होत आहे व त्यांच्या भाग्यश्री स्पोर्ट अकॅडमी(इंटरनॅशनल कुस्ती संकुलन श्रीगोंदा )येथे शिकत असलेल्या सर्व महिला कुस्तीगीर दोन्ही भगिनींचा आदर्श घेऊन आपल्या भारत देशासाठी इंटरनॅशनल गोल्ड मेडल अंतिन याची अपेक्षा आता वाढलेली आहे आणि त्यासाठी त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव श्रीगोंदा तालुका व नगर जिल्हा येथून होत आहे तसेच.
भाग्यश्री पोर्ट अकॅडमी मध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या भाग्यश्री व धनश्री साठी आर्थिक मदतीचा हात श्री अरुण आनंदकर साहेब (जिल्हाधिकारी नाशिक) श्री विजय ब़ोरूडे (तहसीलदार कोपरगाव )श्री बाळासाहेब राऊत (पुणे,)श्री प्रभात सिन्हा सर (माणदेशी चॅम्पियन म्हसवड,)श्री सुभाष मनोत (श्रीगोंदा) हे सर्व पैलवानांना आर्थिक सहकार्य करतात असा उल्लेख आवर्जून फंड सरांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा