Breaking

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

हातनी येथे शिक्षण परिषद संपन्न



हातनी येथे शिक्षण परिषद संपन्न


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

लोहा : तालुक्यातील मारतळा संकुलाचे एकदिवसीय केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हातनी येथे दि.२९-डिसेंबर रोजी संपन्न झाली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिनिधी माधव पाटील कदम हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास गाडे उपाध्यक्ष साहेबराव वन्ने उपसरपंच संभाजी वन्ने माजी सरपंच सुनील अदरगे माजी चेअरमन नागेश हंबर्डे पोलीस पाटील माधव पाटील जाधव केंद्रप्रमुख टी.पी पाटील केंद्रीय मुख्याध्यापक व्यंकट मुगावे व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.

प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन समूह नृत्य लेझीम पथकातील विविध नृत्य सादर करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे पालक शिक्षक अधिकारी पदाधिकारी यांनी बक्षीस देऊन कौतुक केले.कार्यक्रमाच्या प्रचंड प्रतिसाद मिळाला.

केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत इयत्ता दुसरी ते पाचवी निपुण भारत अंतर्गत अभ्यास सर्वेक्षण रूपरेषा मराठी गणित इंग्रजी अभ्यास सर्वेक्षण व माहिती तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन व विविध उपक्रमाबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासा बद्दल केंद्रप्रमुख टी.पी पाटील पंचायत समिती लोह्याचे तज्ञ मार्गदर्शक रामदास कस्तुरे दौलतबादे ,डी.एन.वाघमारे सौ.लव्हेकर यांनी मार्गदर्शन केले.केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.याच कार्यक्रमात शिक्षण सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिक्षक एकता पॅनल प्रमुख देविदास बस्वदे,अशोक पाटील,प्रल्हाद राठोड,सुधाकर यडके,संजय अंबुरे,बंडू भोसले,सुहास मुळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गंगाधर नंदेवाड यांनी केले तर आभार वसंत कदम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दीपकसिंह राठोड,रमेश मेडपलवार,हनुमंत चिवटे,रमेश धडीले सौ.संगीता पाचकवडे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा