Breaking

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यतत्परतेचे सर्वपक्षीय आमदारांकडून विधिमंडळात कौतुक*



मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यतत्परतेचे सर्वपक्षीय आमदारांकडून विधिमंडळात कौतुक*


*गेल्या ५ महिन्यात १ हजार पेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना ११ कोटींची आर्थिक मदत वितरित;हजारो रुग्णांचे वाचले प्राण*

करमाळा(प्रतिनिधी) -  महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सुरू केला. गेल्या पाच महिन्यात या कक्षातून तब्बल १  हजार पेक्षा अधिक रुग्णांना ११ कोटींची थेट आर्थिक मदत करण्यात आली. यामुळे हजारो गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचले. 

रूग्णसेवेच्या या कामगिरीबद्दल सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे  विधानसभेत जाहीरपणे कौतुक केले. 
. यावेळी बोलताना विधानसभेत काँग्रेसचे पुरंदर मतदार संघाचे आमदार संजय जगताप म्हणाले की मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अत्यंत तत्परतेने रुग्णांना मदत करत आहे गेली अडीच वर्षे असून बंद असलेला हा कक्ष सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य मदतीचा आधार झाला आहे



यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वैजापूर मतदारसंघाचे आमदार.रमेश बोरणारे
आले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांचे तारणहार झाले आहेत या पक्षाच्या माध्यमातून चार टेबल ट्रस्टच्या हॉस्पिटल मधून दहा टक्के राखीव असलेल्या खाटा सर्वसामान्यांना उपलब्ध होत आहेत
यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की
वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख म्हणून काम करणारे मंगेश चिवटे अहोरात्र उपलब्ध असतात ते कधीही फोन उचलतात फोन नाही उचलला तर पाच मिनिटात रिप्लाय येतो व रुग्णांच्या अडचणी दूर होण्यास मदत होते हे फार मोठे काम मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी केले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील दुवा आशीर्वाद शिंदे आणि फडणवीस यांना या माध्यमातून लागत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा