बेंबळे येथे दत्त जयंती भक्तीभावाने साजरी ...
बेंबळे। प्रतिनिधी। फोटो
वृत्तांत असा की बेंबळे येथे दत्त-अनुग्रह लाभलेले सुप्रसिद्ध ज्योतिष तज्ञ संजू देव जोशी हे मागील 25 वर्षापासून दत्तात्रयाची सेवा करतात व त्यांच्या अधिपत्याखाली दत्त जयंती साजरी करण्यात येते. बुधवारी, दत्त जयंती दिवशी पहाटे श्री दत्तात्रयाच्या मूर्तीस महा अभिषेक करण्यात आला याचे पौरोहित्य संजूदेव जोशी यांनी केले.
यानंतर भजन कीर्तनचा कार्यक्रम संपन्न झाला व दुपारी बारा वाजता महाआरती नंतर दत्त मूर्तीवर पुष्पृष्टी करण्यात आली व तीर्थ-प्रसादाचे वाटप करण्यात आले .याप्रसंगी गावातील अनेक राजकीय सामाजिक धार्मिक अबाल वृद्ध स्त्री पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवारी दुपारी गावातून माधुगिरी मागण्याचा कार्यक्रम संपन्न झाला व महाआरतीनंतर संभाजी लक्ष्मण भगत व अमोल जगन्नाथ कुलकर्णी यांचे तर्फे गावकऱ्यांना महाप्रसाद म्हणून मिस्टांनाचे भोजन देण्यात आले . या दोन्ही दिवसाच्या धार्मिक उत्सवात बेंबळे येथील भजनी मंडळ आणि युवक मंडळींनी उत्साहाने सहभाग घेतला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा