Breaking

शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

टेंभुर्णी शहरातील जुन्या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे युवा सेनेचे निवेदन





टेंभुर्णी शहरातील जुन्या महामार्गाचे काम  निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे युवा सेनेचे निवेदन




टेंभुर्णी प्रतिनिधी
टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचे काम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतचे निवेदन युवा सेनेचे  जिल्हा समन्वय किशोर देशमुख यांनी सोलापूर येथील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे परियोजना निर्देशक यांना दिले त्या अनुषंगाने त्यांनी टेंभुर्णी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेचे बोलताना ते म्हणाले की
टेंभुर्णी शहरातून जाणाऱ्या महामार्गावरती बायपास झाल्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या जुना महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. या जुन्या महामार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण होण्यासाठी अनेक राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सदर जुन्या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले. परंतु या कामाच्या ठेका घेणारा ठेकेदार सदरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करत असून. तसेच रस्त्यावरती जागोजागी मोठ मोठ्याने खड्डे खालून ठेवले असून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे सूचना फलक लावलेले नाहीत. आणि सदर रस्त्याचे काम सुरू असताना धूळ उडू नये म्हणून सदर कामाच्या ठिकाणी पाणी मारणे जरुरीचे असताना सदर ठिकाणी पाणी मारत नसल्यामुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट निर्माण असून त्यामुळे अनेक नागरिकांना श्वासनाचे आजार होत आहेत. तरी संबंधित ठेकेदाराला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने समज देण्यात यावी अन्यथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा सेनेचे जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांनी यावेळी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा