Breaking

सोमवार, १९ डिसेंबर, २०२२

*स्पर्श इंग्लिश स्कूलची औसा किल्ला शैक्षणिक सहल.*



*स्पर्श इंग्लिश स्कूलची औसा किल्ला  शैक्षणिक सहल.*  


*लातूर प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर सूर्यवंशी*

औसा  : - लहानपणी शाळा मुलांना डबे घेऊन जवळचा एखादा डोंगर, नदी, तलाव या ठिकाणी एका दिवसाची सहल घेऊन जायचे. त्यावेळी मुले खेळ खेळून,सहभोजनाचा आस्वाद घेऊन आनंदाने घरी परतायची. तो आनंद अवर्णनीय असा असायचा. शाळांच्या लांबच्या सहलीसुद्धा प्रेक्षणीय असायच्या. त्यातून मुलांना आनंद आणि माहिती मिळण असे. याचाच एक भाग म्हणून शहरातील "स्पर्श इंग्लिश" स्कूलची'शैक्षणिक, सहल आयोजित करण्यात आली होती. शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेला भुईकोट किल्ला येथे घेऊन जाण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक, व ऐतिहासिक सहलीचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना किल्ल्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली, यावेळी शाळेचे संस्थापक सुलतान शेख, मोईज शेख, मुख्याध्यापिका सय्यद मॅडम व शाळेचे कर्मचारी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा