*सावरगाव ग्रामपंचायतवर पाटील,बोबडे बंधू,माजी सरपंच तोडकरी यांचा वरचष्मा कायम,नागनाथ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी,सरपंचपदी सौ.सुवर्णा पाटील या जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर तालुक्यात अत्यंत चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा) बोबडे, व माजी सरपंच रामेश्वर तोडकरी,माजी उपसरपंच आनंद बोबडे या गावातील प्रमुख मातब्बर नेत्यांच्या नेतृत्वाखालील नागनाथ महाराज ग्रामविकास पॅनलने ग्रामपंचायतवर आपली पकड कायम ठेवत वर्चस्व मिळविले. तर या निवडणुकीत स्थानिक आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. रविवारी मतमोजणी ठिकाणी विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष केला. गावात दुसऱ्या गटाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनेल उभे केल्याने या चारही मात्तबरांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु एकंदरीत निकाल पहाता प्रत्येक उमेदवार अधिक मतांच्या फरकाने व सरपंच पदाच्या उमेदवार पॅनल प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील यांच्या सौभाग्यवती सुवर्णा राजकुमार पाटील यांनी तब्बल 1382 मतांच्या फरकाने विजय मिळवून जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान मिळवला.
सुरुवातीला ही निवडणूक फारच अटीतटीची होणार असे चित्र निर्माण झाले होते.परंतु एकंदरीत निकाल हाती येताच ही निवडणूक एकतर्फी झाल्याचेच दिसून आले.गावातील स्थानिक मातब्बर नेत्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत वरील सत्ता पुन्हा काबीज करीत आपली पकड अबाधित राखण्यात यश मिळवले.
सावरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी सौ. सुवर्णा पाटील या जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. तर सदस्य म्हणून प्रभाग क्रमांक 1 मधून राऊत सीमा सचिन बिनविरोध,अमोल शरद माने,पवार मोनिका अतुल
प्रभाग क्रमांक 2 मधून पाटील रोहित चंद्रकांत,मगर संदेश रामदास, हागरे ज्ञानेश्वरी शाहू
प्रभाग क्रमांक 3 मधून शिंदे धर्मराज निवृत्ती,व्हटकर सुषमा सतीश, तोडकरी स्वाती रामेश्वर
प्रभाग क्रमांक 4 मधून तानवडे परमेश्वर चंद्रकांत,ताटे कीर्ती तायप्पा,प्रभाग क्रमांक 5 मधून
डोलारे रंगनाथ नवनाथ, काडगावकर ज्योती अंबादास हे
सर्व 12 उमेदवार व सरपंच सौ.पाटील भरघोस मतांनी विजयी झाले.
सावरगाव सारख्या बड्या ग्रामपंचायतींवर पुन्हा एकदा जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे,माजी सरपंच रामेश्वर तोडकरी,माजी उपसरपंच आनंद बोबडे यांच्या गटाचा बोलबाला दिसून आला.
निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आनंदोत्सवानंतर पॅनेल प्रमुखांनी सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा