विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ३० नोव्हेंबर पर्यंतचे
पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.
चौथ्या दहा दिवसाचे ऊस बील ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात जमा.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरू असून या गळीत हंगामात गाळपास आलेल्या चौथ्या दहा दिवसाचे ३० नोव्हेंबर पर्यंतचे प्रति टन 2350 रूपये प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता बील सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा सन 2022-23 चा गाळप हंगाम जोमाने सुरू आहे. युनिट नं.1 पिंपळनेर येथे आजअखेर 5 लाख 56 हजार 791 मे.टन व युनिट नं.2 करकंब येथे आजअखेर 1 लाख 67 हजार 085 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या गळीत हंगामात दोन्ही युनिटकडे दि.21/11/2022 ते 30/11/2022 या चौथ्या 10 दिवसाचे कालावधीत गाळपास आलेल्या ऊसास प्रति टन रू.2350/-प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यासाठी कारखान्याने 41 कोटी 3 लाख रूपये ऊस पुरवठादारांचे बँक खात्यावर वर्ग केले आहेत.
सन 2022-23 चा ऊस गाळप हंगाम मार्च अखेर चालणार असून कारखान्याने नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करणेचे नियोजन केलेले आहे. त्यामुळे सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांनी त्यांचे ऊसाची इतरत्र विल्हेवाट लावू नये, त्यांनी आपला संपूर्ण ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्यास गाळपासाठी द्यावा असे आवाहन आ.बबनराव शिंदे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे व इतर अधिकार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा