*श्री गणपती फार्मसी महाविद्यालयात “रेग्युलेटरी अफेअर” या विषयावर मार्गदर्शन* .
टेंभुर्णी/प्रतिनिधी
मौजे. अकोले (खु);ता.माढा. येथील श्री गणपती औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात “रेग्युलेटरी अफेअर” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पुणे येथील टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (TCS) या नामवंत कंपनीत कार्यरत असलेले कृष्णा लोमटे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करत असताना औषध निर्माण शास्त्रात होणाऱ्या वेगवेगळ्या संशोधनाची व रेग्युलेटरी अफेअर याबद्दल माहिती दिली. तसेच फार्मसी नंतर करता येणाऱ्या व्यवसाय व नोकरी या विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच या क्षेत्रातील करिअरच्या संधी व विविध कोर्सेस याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ.आर .डी.बेंदगुडे, अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे,उपाध्यक्ष बाबा येडगे ,प्राचार्या डाॅ. रूपाली बेंदगुडे, सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा. सुकुमार लांडे व प्रा. अक्षय भेंकी यांनी काम केले, प्रा. प्रशांत मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन प्रा. गंगा गोरे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा