महाड शहर पोलीस ठाण्या कडून तीन ग्रामपंचायत हद्दीत सूत्र संचलन ( रूट मार्च)
महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका . रविवारी होत आहेत.या निवडणुकां निर्भय व निपक्ष पाती पणे पार पडण्या साठी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि डी वाय एस पी स्वामी प्रशांत यांच्या मार्गदर्शना खाली शुक्रवारी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी दासगाव मध्ये एस आर पी एफ जवानांन सोबत रूट मार्च केला.
. महाड तालुक्यात १८ डिसेंबर रोजी ५१ ग्राम पंचायतिच्या निवडणूका होत आहेत.या निवडणुका शांत पणे आणि निर्भय व निपक्ष पणे पार पडण्याच्या दृष्टीकोनातून शुक्रवार पासून महाड तालुक्यात तीन पोलीस ठाणे हद्दीत कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बंदोबस्ता साठी जिल्ह्यातून एस आर पी एफ चे जवान तैनात करण्यात आले आहेत.याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि डी वाय एस पी स्वामी प्रशांत यांच्या मार्गदर्शना खाली तालुक्यातील अति महत्वाच्या दासगाव,तुडील आणि नाते या हद्दीत संबंधित पोलीस ठाण्याच्या अधीकारी आणि आलेल्या एस आर पी एफ च्या जवनांकडून सूत्र संचलन करण्यात आले.
महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांनी . महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दासगाव गावा मध्ये आलेल्या एस आर पी एफ च्या जवानांन सोबत रूट मार्च केला. त्या वेळी त्यांच्या सोबत पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी आणि एस आर पी एफ चे आलेले एक अधिकारी आणि २५ जवान सोबत होते.रूट मार्च करत संपूर्ण गावाची पाहणी करून ज्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत त्याची देखील पाहणी केली.सध्या महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून या हद्दीत ३९ मतदान केंद्र आहेत.कोणताही अनुचित प्रकार घडू नये निवडणूक शांततेत पार पडाव्यात या साठी या हद्दीत ५ पोलीस अधिकारी आणि ९७ (अंमलदार )पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकारी महाड शहर मिलिंद खोपडे यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा