गेल्या वर्षीच्या सत्ताधारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवकांच पापं जनतेच्या माथ्यावर... जनतेच्या पैशावरच डल्ला?*
कुर्डुवाडीतील प्रांत कार्यालया समोरील पंढरपूर रस्ताचे तीस लाख रुपये जाणार भ्रष्ट भुयारी खड्ड्यात...
जुन्या भ्रष्ट चुकांमुळे नगरपालिका विद्यमान मुख्याधिकारी व प्रशासनही हतबल...*
अरुण कोरे(पत्रकार),कुर्डुवाडी यांजकडून...
कुर्डुवाडी शहरातील प्रांत कार्यालया समोरील पंढरपूर रोडवर तीस लाख रुपयांचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे...या कामाची निविदा पूर्वीच्या तत्कालीन भ्रष्ट बिनडोक मुख्याधिकारी व त्यांचे बगलबच्चे नगरसेवक पदाधिकारी यांच्या हट्टाहासाने त्यांच्या काळात मंजूर झाली आहे.
वास्तविक पाहता हा रस्ता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कोट्यवधीच्या खर्चाने ओढ्यातील पुलासह करण्यात येणार होता.पण तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी व मुख्याधिकारी यांनी मिली भगत करून केवळ खोके कमाई भ्रष्टाचारासाठी हा रस्ता नगरपरिषदेकडून करण्याचा घाट घातला गेला होता.नागरिकांनी त्यास विरोधही केला होता पण बिनडोक सत्तेपुढे शहाणपण नाही म्हणून नागरिकांनाच त्रास दिला जाऊ लागला.
अरुंद ओढ्यावरील पुलामुळे पहिल्या पावसातच दोनच महिन्यांपूर्वी पाणी नागरी वसाहतीत शिरुन नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या रस्त्यांवरील गेल्या तीन वर्षांपासून भुयारी गटारीचे,पाईप लाईन्सची,चेंबर्सची वारंवार खोदाई केल्याने हा रस्ताच मुळात खड्ड्यात गाढला गेला आहे.
त्याचे दुरुस्तीकरण भुयारी गटारीच्या ठेकेदारानेही वेळोवेळी केले नसल्याने नागरिकांना नाहक धुळीसह त्रास सहन करावा लागत आहे.
अशा या खड्ड्यातील रस्त्याची जमीनीत खोदाई करुन कमीत कमी दोन फूट खडी भरणे गरजेचे होते.पण त्याची तरतूद निविदेतच नाही.
निविदेचे अवलोकन करता विना खोदाई मोठी खडी,त्यावर डांबरीकरण व त्यांवर लहान खडी व डांबरीकरण अशी निविदा केली आहे.निविदेप्रमाणे काम सुरू आहे...
मार्च अखेरपर्यंत सध्याचा तीस लाख रुपये निधी खर्च करावयाचा असल्याने हा रस्ता नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा