Breaking

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत श्री चक्रधर प्राथमिक व माध्यमिक शाळा औसा शाऴेचे उज्वल यश*


*जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत श्री चक्रधर प्राथमिक व माध्यमिक शाळा औसा शाऴेचे   उज्वल यश*



*औसा /प्रतिनिधी ज्ञानेश्वर सूर्यवंशी*.लातूर जिल्हा क्रिडा विभागाच्या वतीने जिल्हा स्तरीय कराटे स्पर्धा क्रिडा संकुल, लातूर येथे संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये औसा  येथील श्री चक्रधर प्राथमिक व माध्यमिक शाळेची विद्यार्थी कुमारी नाईक अक्षरा (वयोगट 17 वर्षे) मधून या विद्यार्थीने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला 
या प्रसंगी संस्थापक सचिव शब्बीर शेख, मुख्याध्यापक मोईज शेख यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते व  विजेत्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा