Breaking

रविवार, २५ डिसेंबर, २०२२

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष पाटील व सतीश पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल रस्त्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण तर महिलेला शिवीगाळी,चौघा विरुद्ध गुन्हा दाखल




राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष पाटील व सतीश पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
 रस्त्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण तर महिलेला शिवीगाळी,चौघा विरुद्ध गुन्हा दाखल


सांगोला/प्रतिनिधी
            रस्त्याच्या कारणावरून एका व्यक्तीस बेदम मारहाण तर महिलेला शिवीगाडी केली असल्याचा प्रकार सांगोला या ठिकाणी घडला आहे सदर घटनेत.शालिनी प्रवीण गायकवाड राहणार वाडेगाव रोड पवार वस्ती पती प्रवीण मुलगा श्रेयस मुलगी श्रेया असे कुटुंबासह राहणेस असून माझे पती मजुरी करतात त्यावर आम्ही आमचे कुटुंबाची उपजीविका भागवतो आमचे घरापासून जवळच राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सुभाष कृष्णदेव पाटील व त्यांची मुले सतीश सुभाष पाटील संतोष सुभाष पाटील तसेच त्यांचची बायको मुलांसह राहत आहेत त्यांचे शेतामधून असलेला नगरपालिकेचा रस्ता आमचे घराकडे येतो. दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता चे सुमारास माझी मुलगी श्रेया ही मला घरी सांगत आली की पप्पांना संतोष पाटील मारत आहेत, म्हणून मी सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता संतोष पाटील हे नवऱ्याला मारहाण व शिवीगाडी करीत होते त्यावेळी मी त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा माझी मुलगी उलट्या करू लागल्याने मी माझा नवरा प्रवीण यांना मुलीला घेऊन सांगोला येथे दवाखान्यात पाठवले होते व मी माझे घरी निघून आले त्यावेळी संतोष पाटील यांना घरातील बंदूक आण त्याला आज ठेवत नाही अशी दमदाटी केली त्यानंतर तेथे संतोष पाटील यांचा भाऊ सतीश पाटील हा सुद्धा तेथे आला तो दारू पिलेला होता त्या दोघांनी मला ढकलून देऊन लाथा बुक्क्याने मारहाण केली तसेच संतोष पाटील यांनी माझ्या अंगावरील साडीचा पदर ओढून माझी छाती दाबून माझे मनास लज्जा वाटेल असे प्रत्येक केले आहे त्यावेळी शुभांगी संतोष पाटील हिने मला धरून ठेवले होते त्यानंतर मी दुपारी तीन वाजता चे सुमारास सुभाष पाटील यांचे घरी जाऊन त्यांना घडलेला प्रकार सांगून त्यांची मुलाबाबत त्यांच्याकडे तक्रार करीत असताना सुभाष कृष्णराव पाटील यांनी मला ए कुत्रे येथून जाते का नाही का माझी मुले तुझ्यावर सोडू का अशी लज्जास्पद भाषा वापरली व मला शिवीगाडी केली आहे त्यामुळे मी घरी आले माझे अंगावर परक्या माणसाने हात टाकला व माझे नवऱ्यास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली यामुळे मला टेन्शन आल्याने मी माझे राहते घरी विषारी औषध प्राशन केले तेव्हा मला माझे घरचे लोकांनी मला ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे उपचारास दाखल केले होते आज रोजी माझी तब्येत ठीक असल्याने पोलीस ठाणे तक्रार देण्यात आली आहे तरी दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताची सुमारेस माझा नवरा प्रवीण या संतोष सुभाष पाटील हा मारहाण करीत असताना मी नवरा प्रवीण या सोडून त्याच्या मुलगी श्रेया हीच दवाखान्यात घेऊन सांगोला येथे पाठविला असता संतोष सुभाष पाटील व सतीश सुभाष पाटील यांनी मला सदर भांडणाचा राग मनात धरून घाण घाण शिवीगाळी करून लाथा बुक्क्याने मारहाण केली आहे तसेच संतोष सुभाष पाटील यांनी माझ्या अंगावरील साडीचा पदर उडून लज्जास्पद कृत्य केली आहे त्यावेळी शुभांगी संतोष पाटील यांनी मला धरून देखील ठेवले असल्यामुळे त्यांचे वडील सुभाष कृष्णा पाटील यांनी सांगितले असता त्यांनी ए कुत्रे इथून जाती का नाही अशा स्वरूपाची भाषा वापरल्याने व शिवीगाळी केल्याने माझी चौघा विरुद्ध फिर्याद सांगोला पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा