Breaking

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवेदन


मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवेदन



प्रतिनिधी रेडा
शशिकांत सोनटक्के

         आज शनिवार दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता मा.देवेंद्र फडणवीस( गृहमंत्री,महाराष्ट्र राज्य.) यांच्या नावाने वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशन चे इन्चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम सांळुखे यांच्या कडे मी आंबेडकरवादी सामाजिक संघटनेने निवेदन सुपुर्द केले.
      ‌ या निवेदनामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनी आपल्या मंत्रीमंडळातील व पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांनी या देशाचे क्रांतीसुर्य महात्मा फुले, संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर,  शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करून समस्त देशाच्या भावना दुखावल्या असुन त्यांची
१) महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातुन हकालपट्टी करावी.
२) जबाबदार म्हणून तुम्ही व बेजबाबदार म्हणून त्यांनी माफी मागावी
३) ॲट्रोसिटी ॲक्ट कलमान्वये चंद्रकांत पाटील यांच्या वर गुन्हा नोंदवावा. 
          अशी मागणी केली आहे.
                      तसेच अशा मनोवृत्ती चे लोक महाराष्ट्रासाठी धोकादायक असुन त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
                 यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरजभैय्या वनसाळे संघटनेचे सचिव अनिल केंगार संघटनेचे संपर्क प्रमुख नागेश भोसले, लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य संतोष पिपा लोंढे, संघटनेचे तालुका महिला अध्यक्ष अनिता कांबळे,  सामाजिक कार्यकर्ते शेखरभाऊ काटे, क्षितीज वनसाळे,भोला गायकवाड, रोहीत सोनवणे, रवि लोंढे, बापु तुपे,  मंदाताई धाकतोडे हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा