' उद्दिष्ट शंभर टन प्लस' योजनेत सहभागी होऊन आर्थिक जीवनमान उजवावे....
आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे ।प्रतिनिधी।
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्या मार्फत राबवण्यात येत असलेल्या ', 'उद्दिष्ट 100 टन प्लस' योजनेसाठी 'बांधावर जाऊन योग्य मार्गदर्शन' उपक्रमास शेतकऱ्यांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून चालू गळीत हंगामात अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत प्रति एकर शंभर टन पेक्षा जास्त उत्पादन घेतल्याचे दिसून येत आहे. या चांगल्या योजनेत शेतकऱ्यांनी आवर्जून सहभागी व्हावे, ऊस उत्पादन वाढवावे व आपले आर्थिक जीवनमान उंचवावे असे आव्हान कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनराव शिंदे यांनी केले आहे.
वृत्तांत असा की तीन वर्षांपूर्वी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातर्फे शेतकऱ्यांनी उसाचे प्रति एकरी उत्पादन वाढवावे म्हणून उद्दिष्ट 100 टन प्लस ही योजना गावोगावी राबवण्याचे नियोजन केले. त्याप्रमाणे ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन , बांधावर जाऊन योग्य मार्गदर्शन हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. यासाठी कृषिरत्न डॉक्टर संजीव माने, कारखान्याचे केन मॅनेजर संभाजी थिटे, शेतकी अधिकारी सुनील बंडगर, ऊस विकास अधिकारी नारायण लगड, ॲग्री ओव्हरसीयर , चीट बॉय व बेंबळे येथील उत्कृष्ट ऊस उत्पादक कृषी भूषण सोमनाथ हुलगे यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले. शेतकऱ्यांना जमिनीचे माती परीक्षण, नांगरट, फन-पाळी, सरीतील अंतर, शेणखताचा वापर, लागण हंगामानुसार उसाचा वाण, ऊस लागण, बेण्याच्या दोन डोळ्यांमधील अंतर, बेसल डोस ,जमिनीचा सामू (पीएच) नुसार खताच्या मात्रा, ठिबक सिंचन मधून पाण्याच्या पाळ्या, तण नियंत्रण, आळवणी ,फवारणी, ऊस वाढ सुरू झाल्यानंतरचे काळजीपूर्वक निरीक्षण व संरक्षण, ऊस तोडणी नंतर पाचट न जाळणे, व पुन्हा खोडवा पिकाविषयी माहिती इत्यादी बाबीचे सविस्तर चार्ट तयार करून, प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन केले आहे .यानुसार सन 2021-22 गळीत हंगामात बेंबळे येथील कृषी भूषण बागातदार सोमनाथ भास्कर हुलगे यांनी प्रति एकरी 117 टन तर सध्याच्या 2022 - 23 हंगामात आत्तापर्यंत भारत बाबर, परिते 120 टन
(को 265), मधुकर गपाटे बारलोणी 111 टन (कोसी ८६०३२), गणेश हांडे, फूटजवळगाव 108 टन (को 265), दत्तात्रय पोटरे 102 टन (को 265), विनय लोकरे उजनी 116 टन (को 265) याप्रमाणे प्रति एकरी उत्पादन घेतले आहे. चालू हंगामातील ऊस लागणी देखील अनेक शेतकरी या योजनेत सहभागी होताना दिसून येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा