Breaking

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

सनराईज् इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी विपुली विकास खटके हिची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड



सनराईज् इंग्लिश मीडियम स्कूल ची विद्यार्थिनी विपुली विकास खटके हिची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड


      महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येत असलेल्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल नगोर्ली रोड टेंभुर्णी या प्रशालेची विपुली विकास खटके या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय फ्री स्टाईल 54 किलो वजनी गट कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत विभागीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.

टेंभुर्णी शहर व परिसरामध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहित करणारी अग्रगण्य संस्था म्हणून श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ संचलित टेंभुर्णी या संस्थेचे चेअरमन श्री योगेश बोबडे व सचिवा सुरजा बोबडे यांनीही विपुलीचे व तिच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन केले.
सनराईज् स्कूल चे प्राचार्य श्री गणेश पालवे यांनीही प्रशालेसाठी अभिमानाची बाब सांगत विपुलीचे व तिला मार्गदर्शन करणारे प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री सुरज वसे यांचेही अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा