माढा विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या विजयी पदाधिकार्यांचा आमदार बबनदादा शिंदे यांचे हस्ते सन्मान.....
बेंबळे। प्रतिनिधी।
माढा विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार बबनदादा शिंदे यांचे कट्टर समर्थक कार्यकर्त्यांनी गावोगावी आपले वर्चस्व प्रस्थापित करून भरघोस मतांनी सरपंच पद व सदस्य पदावर विजय मिळवला आहे. नागपूर अधिवेशनांमधून रविवारी सुट्टीवर आलेले आमदार बबनदादा शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी गावोगावच्या विजयी ग्रामपंचायतच्या नागरिकांनी भेट घेतली. आमदार बबनदादा शिंदे यांनी याप्रसंगी विजयी सरपंच , ग्रामपंचायत सदस्य तसेच पार्टी प्रमुख यांचा सन्मान केला व आलेल्या गावकऱ्यांनीही बबनदादांचा हृद्य सत्कार केला व 'एकच वादा बबनदादा' असा जल्लोष करून गुलालाची उधळण केली व मिठाईचे वाटप केले, त्यामुळे निमगाव( टे.) गावाला रविवारी राजकीय यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
'पूर्वीप्रमाणेच आपल्या गावी विकास योजना राबवताना कोणतेही पक्षपाती राजकारण करू नका, २० टक्के राजकारण व 80% समाजकारण हे आपले तत्व सर्वांनी अमलात आणा ,माझे कडून आपणास नेहमीप्रमाणेच सदैव सहकार्य कायम राहणार आहे' असा ठाम विश्वास बबनदादांनी भेटीसाठी आलेल्या सर्व नागरिकांना दिला. पूर्वीप्रमाणेच आम्ही देखील आमदार बबनदादा शिंदे यांचे पाठीशी पूर्ण विश्वास आणि खंबीरपणे राहून त्यांना वेळोवेळी सहकार्य करणार असा विश्वास उपस्थित ग्रामस्थांमधून व्यक्त होत होता.
यावेळी माढा तालुक्यातील दारफळ, भोसरे, रोपळे खुर्द, भेंड, चौभे पिंपरी, घाटणे, चिंचोली व शिंगेवाडी तर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर तालुक्यातील तुंगत, खेड भोसे, मेंढापूर, अजोती, बार्डी, टाकळी (गुरसाळे), होळे आणि खरातवाडी या ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, पार्टी प्रमुख व गावकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत होती .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा