Breaking

सोमवार, १६ जानेवारी, २०२३

श्रीगोंदा पोलीसांकडुन मोटारसायकल चोराला अटक- 07 मोटारसायकल जप्त


श्रीगोंदा पोलीसांकडुन मोटारसायकल चोराला अटक- 07 मोटारसायकल जप्त



श्रीगोंदा-नितीन रोही

सविस्तर माहिती अशी की दिनांक 21/12/2022 रोजी ललित सुभाष गुगळे रा. श्रीगोंदा यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली की. दिनांक 19/12/2022 रोजी आज्ञात चोरट्याने फिर्यादी राहत असलेल्या घरासमोरुन त्यांची एच एफ डिलक्स मोटारसायकल चोरुन नेली आहे अशी फिर्याद दिल्याने पोलीस स्टेशन ला गुन्हा रजि नंबर । 1071/2022 भा.द.वि.क 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपासात श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वरील गुन्हातील मोटारसायकल रविंद्र विठ्ठल पवार रा.साळवणदेवीरोड श्रीगोंदा याने चोरली आहे व तो श्रीगोंदा बस स्टॅन्ड वर येणार आहे. त्यावरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना श्रीगोंदा बस स्टॅन्ड येथे सापळा लावणेबाबत सांगीतले श्रीगोंदा येथील बस स्टॅन्ड वर दिनांक 13/01/2023 रोजी 16/00 वा. चे सुमारास सापळा लावुन संशयीत ईसम रविंद्र विठ्ठल पवार रा साळवनदेवीरोड यास ताब्यात घेतले. त्याचेकडे मोटर सायकल चोरीबाबत पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व त्याचेकडुन गुन्ह्यातील एच एफ डी डिलक्स एम एच 16 ऐ के 2666 मोटर सायकल व इतर गुन्हातील चोरी केलेल्या सहा मोटर सायकल एकुण-2.37,000/- रू किंमतीच्या सात मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपी कडुन मोटार सायकल चोरीचे खालील गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

1) श्रीगोंदा पोलास स्टेशन गुन्हा रजि नं 1071/2022 भादवी कलम 379 2) श्रीगोंदा पोलास स्टेशन गुन्हा रजि नं 22/2023 भादवी कलम 379

(3) श्रीगोंदा पोलास स्टेशन गुन्हा रजि नं 41/2023 भादवी कलम 379 आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असुन आरोपीकडुन आणखी मोटारसायकल चे गुन्हे उगडकीस

येण्याची शक्यता आहे. गुन्हाचा तपास पोना/ 2138 बी.एल. खारतोडे करत आहेत.

सदरची कारवाई मा. राकेश ओला पोलीस अधिक्षक मा. प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधिक्षक,मा. आण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पो.ना खारतोडे, पो.कॉ पठाण, पो.कॉ/ नवसरे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा