*तुळजाभवानी हॉलीबॉल संघा तर्फे घेण्यात आलेल्या निमंत्रीत एकदिवसीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन मजूर फेडरेशनचे अध्यक्ष तसेच संघाचे जेष्ठ सदस्य श्री नारायण भाऊ नन्नवरे यांच्या हस्ते संपन्न*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.
दिनांक 15 जानेवारी रोजी तुळजाभवानी हॉलीबॉल संघा तदिनांक 15 जानेवारी रोजी तुळजाभवानी हॉलीबॉल संघा तर्फे घेण्यात आलेल्या निमंत्रीत एकदिवसीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन मजूर फेडरेशनचे अध्यक्ष तसेच संघाचे जेष्ठ सदस्य मा.नारायण भाऊ नन्नवरे व माजी सिनेटर्फे घेण्यात आलेल्या निमंत्रीत एकदिवसीय डायरेक्ट हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन मजूर फेडरेशनचे अध्यक्ष तसेच संघाचे जेष्ठ सदस्य मा.नारायण भाऊ नन्नवरे व माजी सिनेट सदस्य प्राध्यापक संभाजीराव भोसले सर यांच्या हस्ते पार पडले.
या स्पर्धे मध्ये एकूण 10 संघाने सहभाग नोंदवून स्पर्धेची शोभा वाढवली.स्पर्धे मध्ये पहिला सेमिफायनल वैराग व नळदुर्ग स्कारलेट या संघामध्ये झाला डोळ्याचे पारणे फेडणारा हा सामना झाला या मध्ये नळदुर्ग स्कारलेट या संघाने अटीतटीच्या सामन्यात बाजी मारली व अंतिम फेरी मध्ये धडक मारली दुसरा सेमिफायनल तुळजाभवानी हॉलीबॉल संघ व तामलवाडी या संघामध्ये झाला अतिशय तुल्यबळ असणाऱ्या या संघा विरोधात तुळजाभवानी हॉलीबॉल संघाने बाजी मारून एकतर्फी विजयची नोंद केली।।
अंतिम सामना हा तुळजाभवानी हॉलीबॉल संघ व नळदुर्ग येथील स्कारलेट हॉलीबॉल या दोन बलाढ्य संघा मध्ये पार पडला प्रथमतः तुळजाभवानी संघाने एकतर्फी आघाडी घेऊन सामन्यात वर्चस्व प्रस्थापित केले होते पण नंतर नळदुर्ग संघाने चिवट खेळून सामन्यात रंगत आणली होती शेवटी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तुळजाभवानी संघाने बाजी मारली।
या प्रसंगी मा.हणमंते सर,प्रा.थोरात सर,बापू गायकवाड सर,संदीप चौगुले,राजाभाऊ देशमुख,संदीप रोकडे, यांनी रोख बक्षीस दिली..
यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी विशेषतः अनिल राठोड, प्रताप पापा पवार,प्रशांत शिंदे बालाजी मुळे सर,संतोष आप्पा इंगळे,स्वराज हंगरगेकर, श्रेयस कुतवळ,रवी घोटकर,रणजित निंबाळकर,बागवान भाई,नीरज साळुंके,बाळासाहेब नन्नवरे, ई.सदस्यांनी कष्ट घेतले..
सामन्यात सूत्रसंचालन अमोघ वाणीने प्राध्यापक थोरात सर यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा