विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे 10 जानेवारी अखेर ऊस बील जमा- आ.बबनराव शिंदे.
10 जानेवारी अखेर पेमेंट करणारा जिल्ह्यातील एकमेव कारखाना
टेंभुर्णी प्रतिनिधी/विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब येथील सन 2022-23 चा गाळप हंगाम सुरू असून या गळीत हंगामात गाळपास आलेल्या 10 जानेवारी अखेर पर्यंत प्रति टन 2350 रूपये प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता बील सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा करण्यात आले असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.
अधिक माहीती देताना आ.बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा सन 2022-23 चा गाळप हंगाम जोमाने सुरू आहे. युनिट नं.1 पिंपळनेर येथे आजअखेर 11 लाख 823 मे.टन व युनिट नं.2 करकंब येथे आजअखेर 3 लाख 34 हजार 250 मे.टन ऊसाचे गाळप झालेले आहे. या गळीत हंगामात 10 जानेवारी अखेर पर्यंत गळीतास आलेल्या ऊसाचे प्रति टन रू.2350/-प्रमाणे ऊस बील अदा करण्यात आले आहे. या गळीत हंगामात दोन्ही युनिटकडे दि.01/01/2023 ते 10/01/2023 या आठव्या 10 दिवसाचे कालावधीत गाळपास आलेल्या ऊसास प्रति टन रू.2350/-प्रमाणे पहिला ॲडव्हान्स हप्ता ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. त्यासाठी कारखान्याने 39 कोटी 99 लाख रूपये ऊस पुरवठादारांचे बँक खात्यावर वर्ग केले आहेत. 10 जानेवारी अखेर ऊस बील अदा करणारा विठ्ठलराव शिंदे एकमेव कारखाना आहे
सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे व इतर अधिकार उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा