Breaking

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे यांचेवतीनेविठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दिलीप लव्हटे यांना उत्कृष्ठ फायनान्स मॅनेजर वसंतोष गव्हाणे यांना उत्कृष्ठ पर्यावरण अधिकारी पुरस्कार जाहीर-


वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे यांचेवतीने

विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दिलीप लव्हटे यांना उत्कृष्ठ फायनान्स मॅनेजर व


संतोष गव्हाणे यांना उत्कृष्ठ पर्यावरण अधिकारी पुरस्कार जाहीर-


बेंबळे।प्रतिनिधी / मुकुंद रामदासी 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे या संस्थेच्या वतीने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे फायनान्स मॅनेजर दिलीप दगडू लव्हटे  यांना सन 2021-22 चा उत्कृष्ठ फायनान्स मॅनेजर पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे या संस्थेच्या वतीने प्रति वर्षी राज्यातील सहकारी साखर कारखान्यामध्ये खातेप्रमुख या  पदावर काम करणा-या उत्कृष्ठ चिफ इंजिनिअर, उत्कृष्ठ शेती अधिकारी,उत्कृष्ठ चिफ केमिस्ट.,उत्कृष्ठ आसवणी व्यवस्थापक,उत्कृष्ठ कार्यकारी संचालक, उत्कृष्ठ पर्यावरण अधिकारी यांनी मागील तीन वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचे अवलोकन करून त्यांची या वैयक्तिक पुरस्कारासाठी निवड करण्यात येत आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे या संस्थेकडून सन 2021-22 साठी विठ्ठलराव शिंदे  सहकारी साखर कारखान्याचे  फायनान्स मॅनेजर दिलीप दगडू लव्हटे यांचे मागील तीन वर्षातील कामगिरी विचारात घेवून त्यांची उत्कृष्ठ फायनान्स मॅनेजर पुरस्कारासाठी निवड केलेली आहे.
 

तसेच विठ्ठलराव शिंदे  कारखान्याचे पर्यावरण अधिकारी संतोष विठ्ठलराव गव्हाणे यांना  वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे या संस्थेकडून सन 2021-22 साठी उत्कृष्ठ पर्यावरण अधिकारी पुरस्कार जाहीर झालेला आहे. सदर पुरस्काराचे वितरण शनिवार दि.21/01/2023 रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट,पुणे येथे  होणार आहे.

 
सदर पुरस्कार प्राप्त झालेबद्दल कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आ.बबनराव शिंदे, व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे, कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे,सर्व संचालक मंडळ व अधिकारी व कर्मचारी यांनी फायनान्स मॅनेजर दिलीप लव्हटे व पर्यावरण अधिकारी संतोष गव्हाणे यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा