घोटी येथे जिजाऊ,सावित्री,रमाई यांची संयुक्त जयंती साजरी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट : राजमाता राष्ट्रमाता माँ.साहेब जिजाऊ यांच्या ४२५ व्या जन्मोत्सवानिमित्त परिवर्तनवादी महिलांनी पुढाकार घेत घोटी येथील हनुमान मंदिरात माता जिजाऊ,मातारमाई ,माता सावित्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी माँ.साहेब जिजाऊ माता सावित्री माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीमाई मातारमाई यांच्या विचाराचा जागर द्वारा आयोजित त्यांच्या सृजनशील कल्पकतेतून सावित्रीबाई फुले विचारमंच्याच्या अध्यक्षा शुभांगी ताई ठमके यांचे व्याख्यान संपन्न झाले.
याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी घोटी गावाच्या प्रथम नागरीक मा.निर्मलाबाई माधव मेश्राम या होत्या तर प्रमुख व्याख्याता म्हणून सावित्रीमाई फुले विचारमंच्याच्या अध्यक्षा शुंभागीताई ठमके प्रमुख पाहुण्या,वैशालीताई लाखकर,
ज्योतीताई कदम, तंटामुक्ती अध्यक्ष देवरथ मुनेश्वर,उपसरपंच राजू पाटील सुरोसे, ग्रामपंचायत सदस्य आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रितीका राजू सुरोशे यांनी केले तर शेवटी आभार आरती कोसले यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा