Breaking

मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 27 छापे.”


अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 27 छापे.”

 प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन काल गुरुवार दि.30.01.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 27 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु व देशी- विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त केले. जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 90,235 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 27 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 5 ठिकाणी छापे टाकले. यात मुरूम पो.ठा. हद्दीत तुगाव ग्रामस्थ- शिवराज करगले यांनी सुंदरवाडी येथे कपड्याच्या शेड समोर एकुण 3,880 ₹ किंमतीची गावठी दारु बाळगलेले, तर तामलवाडी पो.ठा. हद्दीत  तामलवाडी- सनी वलसा हे सत्यम हॉटेलच्या मोकळ्या जागेत एकुण 2,460 ₹ किंमतीच्या देशी दारूच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर ढोकी पो. ठा. हद्दीत जागजी येथील- सुनिल देशमुख हे जागजी शिवारातील राज हॉटेलच्या पाठीमागे एकुण 3,050 ₹ किंमतीच्या देशी दारूच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर नळदुर्ग पो.ठा.हद्दीत काळेगाव येथील- विकास भोवळ हे  काळेगाव येथे एकुण 3,300 ₹ किंमतीच्या देशी दारूच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर लोहारा पो.ठा. हद्दीत वाडीवडगाव, ता,लोहारा येथील- राहुल बचाटे हे लोहारा येथे माळेगाव लोहारा जाणारे रोडलगत एकुण 1,450 ₹ किंमतीच्या देशी दारूच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.

2) अंबी पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आनाळा, ता. परंडा ग्रामस्थ- प्रकाश शिंदे हे गावातील आपल्या राहत्या घरा समोर एकुण 910 ₹ किंमतीच्या देशी दारूच्या  सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.

3) उमरगा पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात काळे प्लॉट, उमरगा येथील- युवराज एरसन  हे उमरगा येथे भाजी मंडई मध्ये  अंदाजे 3,900 किंमतीची गावठी दारु बाळगलेले, तसेच गुजोंटी, ता, उमरगा  ग्रामस्थ्‍- चंद्रकांत जाधव गुजोंटी येथे मनोरंजन पार्क मधील पत्रा शेड समोर अंदाजे 960 ₹ किंमतीची गावठी दारू बाळगलेले आढळले.

4) उस्मानाबाद (श) पो.ठा.च्या पथकाने 2 छापे टाकले. यात इंगळे गल्ली, उस्मानाबाद ग्रामस्थ- लक्ष्मण निचळे हे उस्मानाबाद शेडवजा हॉटेल इंदिरानगर येथे एकुण 4,455 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर इंदिरानगर ग्रामस्थ- ज्योती चव्हाण ह्या  आपल्या राहते घरा समोर 10 गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

5) मुरुम पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. यात येनेगुर, ता. उमरगा येथील- राम गायकवाड हे गावातील आपल्या घरासमोर अंदाजे 2,400 ₹ किंमतीची  गावठी  दारु  बाळगलेले आढळले.

6) लोहारा पो.ठा. च्या पथकाने 3 छापे टाकले. यावेळी  कानेगाव, गामस्थ- बालाजी कांबळे हे गावातील आपल्या राहते घरा समोर अंदाजे 1,520 ₹ किंमतीच्या देशी  विदेशी  दारुच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर जेवळी (उ) ग्रामस्थ- गोरीबी शेख ह्या गावातील आपल्या राहते घरा समोर अंदाजे 950 ₹ किंमतीची गावठी  दारु बाळगलेल्या, तर- सास्तुर, ता. लोहारा ग्रामस्थ – अशोक वाघमारे हे सास्तुर येथील बाजार कट्टा येथे अंदाजे 1,440 ₹ किंमतीच्या देशी  विदेशी  दारुच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.

7) परंडा पो.ठा. च्या पथकाने 2 छापे टाकले. अक्कलगाव, ता. माढा ग्रामस्थ- अनिल जगताप हे कपिलापुरी शिवारातील परंडा ते कुर्डवाडी जाणारे रोडलगत देशी  विदेशी अंदाजे 1,350 ₹ किंमतीच्या देशी दारुच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर यावेळी कौडगाव ग्रामस्थ- व्यंकट घरबुडवे हे कौडगाव येथील शिंदे पम्चर दुकाना जवळ अंदाजे 1,530 ₹ किंमतीच्या देशी  विदेशी  दारुच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.

8) आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने रामनगर येथे छापा टाकला. यावेळी पारधीपिडी, सांजा ग्रामस्थ- शेवंता पवार ह्या  रामनगर सांजा येथे अंदाजे 2,200 ₹ किंमतीची  गावठी  दारु  बाळगलेल्या आढळल्या.

9) वाशी पो.ठा. च्या पथकाने  छापा टाकला. यावेळी चिरकाड वस्ती पारा, ता. वाशी ग्रामस्थ- सुनिता शिंदे ह्या ते चिरकाड वस्ती  येथे अंदाजे 1,620 ₹ किंमतीची  गावठी  दारु  बाळगलेल्या आढळल्या.

10) कळंब पो.ठा. च्या पथकाने कळंब येथे छापा टाकला. यावेळी ग्रामस्थ- महेद देडे या सोनार गल्लीकडे जाणारे रोडलगत अंदाजे 1,280 ₹ किंमतीची  देशी  विदेशी  दारुच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले

11) ढोकी पो.ठा. च्या पथकाने ढोकी येथे 2 छापे टाकले. कोंड, ता. उस्मानाबाद येथील-फातीमा जाधव ह्या कोंड येथे अंदाजे 4,000 ₹ किंमतीची  गावठी  दारु  बाळगलेल्या,तर  कसबे तडवळा, उस्मानाबाद येथील-सिताबाई काळे ह्या कसबे तडवळा येथे अंदाजे 5,880 ₹ किंमतीची  गावठी  दारु  बाळगलेल्या आढळल्या.

12) शिराढोण पो.ठा. च्या पथकाने येथे 2 छापे टाकले रांजणी, ता. कळंब येथील- शाहनवाज शेख हे रांजणी येथील साखर कारखाण्याचे जवळ अंदाजे 600 ₹ किंमतीच्या देशी  विदेशी  दारुच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर ढोकी येथील- सोनाबाई काळे या वाठवडा गावाच्या शेजारी असलेल्या तलावाच्या शेजारी अंदाजे 600 ₹ किंमतीची  गावठी  दारु  बाळगलेल्या आढळल्या.

13) तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने येथे 2 छापे टाकले सिंदफळ येथील- दत्ता कांबळे हे सिंदफळ शिवारात गावालगत अंदाजे 2,100 ₹ किंमतीची  गावठी  दारु  बाळगलेले,तर वेताळनगर, येथील- विजय माने हे वेताळनगर येथे  अंदाजे 1,050 ₹ किंमतीची  गावठी  दारु  बाळगलेले आढळले.

14) भुम पो.ठा. च्या पथकाने छापा टाकला. यावेळी जांब, ता. भुम ग्रामस्थ- आशीष भोरे हे बावी ते भुम जाणारे रोडलगत हॉटेल साईसागर समोर अंदाजे 980 ₹ किंमतीच्या देशी  विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या बाळगलेले आढळले.

15) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने छापा टाकला यावेळी इंदापूर रोड माणिक दंड ता. वाशी ग्रामस्थ- जलसाबाई काळे ह्या आपल्या राहते घरा  समोर अंदाजे 35,650 ₹ किंमतीची  गावठी  दारु  बाळगलेल्या आढळल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा