Breaking

मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

कै.विठ्ठलराव शिंदे विद्यालयाची आल्फिया बशीर शेख बांबू उडी मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीय



कै.विठ्ठलराव शिंदे विद्यालयाची आल्फिया बशीर शेख बांबू उडी मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीय



कन्हेरगाव(प्रतिनिधी) राजेंद्र केदार


               दि.29 ते 31 जानेवारी रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये आपल्या विद्यालयातील 3 विदयार्थीनी पुणे विभागात प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता , हातोडा फेक मध्ये चैतन्य हनुमंतराव जाधव याला राज्यस्तरीय सहभाग प्रमाणपत्र प्राप्त झाले, त्यासोबतच थाळी फेक मध्ये प्रथमेश धनंजय नलवडे महाराष्ट्र राज्यामध्ये पाचवा क्रमांक मिळवत राज्यस्तरीय सहभाग प्रमाणपत्र प्राप्त केले ,  सोबत आल्फिया शेख हिने 2.40 उडी मारत महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीय येण्याचा मान मिळविला , या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य जवानसिंग रजपुत सर व क्रीडा शिक्षक विलास केदार सर , दत्तात्रय देवकते सर , देविदास जगताप सर यांचे मार्गदर्शन लाभले.
             या सर्व विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे क्रीडा उपसंचालक व पुणे जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे साहेब , सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर साहेब , माढा तालुका क्रीडा अधिकारी नाईकवाडी साहेब, गणेश पवार साहेब यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून मेडल दिले .
                या यशाबद्दल माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे, सोलापूर जिल्हा दूध संस्थेचे चेअरमन रणजीत भैय्या शिंदे, सभापती विक्रम दादा शिंदे, माढा वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा विठ्ठलगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन धनराज दादा शिंदे,निमगाव (टें) गावचे सरपंच यशवंत भैय्या शिंदे संस्थेचे सचिव व अकोले खुर्द विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र ठोंबरे सर, कन्हेरगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल लोंढे सर , स.रा.मोरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुरवसे मॅडम , विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक  मच्छिंद्र पाटील सर , कॉलेज विभाग विष्णू घाडगे सर यशवंत प्रायमरी स्कूलचे प्राचार्य सोमनाथ होनमोटे सर , शिक्षक-शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक यांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा