अकोले खुर्द येथील बबनराव शिंदे विद्यालयाचे पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेतील यश .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेतली जाणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वीचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेसाठी बबनराव शिंदे माध्व उच्च माध्यमिक विद्यालय , अकोले खुर्द तालुका माढा येथील 24 पैकी 20 विद्यार्थी पात्र ठरले.
यामध्ये श्रेया सुखदेव चौधरी हिने 298 पैकी 272 गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळवले , प्रांजल तेजस नवले हिने 298 पैकी 254 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादी 96 वा क्रमांक मिळवला , सृष्टी रवींद्र माने हिने 298 पैकी 236 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादी 238 वा क्रमांक मिळवला , श्रावणी मच्छिंद्र दिवटे हिने 298 पैकी 232 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 283 वा क्रमांक मिळवला. प्राचार्य राजेंद्र ठोंबरे , धनुसिंग रजपूत यांचे मार्गदर्शन लाभले .
आमदार संजयमामा शिंदे , संस्थेचे सचिव प्राचार्य राजेंद्र ठोंबरे , प्राचार्य जवानसिंग रजपूत , मुख्याध्यापिका सुरवसे यांनी अभिनंदन केले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा