Breaking

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

भाजपाचे मा. तालुका अध्यक्ष भगत यांच्या हॉटेल ध्रुवतारा चे आ.बबनदादा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन*



*भाजपाचे मा. तालुका अध्यक्ष भगत यांच्या हॉटेल ध्रुवतारा चे आ.बबनदादा शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन*


टेंभुर्णी प्रतिनिधी
  टेंभूर्णी- कुर्डूवाडी रोडवर टेंभुर्णी एमआयडीसी नजिक नव्यानेच सुरू होत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे माजी माढा तालुका अध्यक्ष विनायक भगत यांच्या हॉटेल ध्रुवतारा व्हेज- नॉनव्हेज हॉटेलचे उद्घाटन माढा तालुक्याचे आमदार बबन दादा शिंदे यांच्या हस्ते व तालुक्यातील सर्वपक्षिय मान्यवर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज सकाळी 11 वाजता उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी  बोलताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की राजकारण समाजकारण करत असताना आजच्या तरुण पिढीने उपजीविकेच्या साधनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे विनायक भगत यांचे आयुष्य राजकारण व समाजकारण यात गेले असले तरी त्यांच्या मुलांनी मात्र उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे त्यांच्या या हॉटेल व्यवसायाला नक्कीच चांगले दिवस येतील हॉटेल ध्रुवतार आहे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व टेंभुर्णी एमआयडीसी या दोन्हीच्या मध्यावर असल्याने या भागातील उद्योजक व उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने येणारे राज्य परराज्यातील व्यापाऱ्यांना एक चांगली सोय झाली असून भगत कुटुंबाने विनम्र व तत्पर सेवा द्यावी त्यांच्या व्यवसायाला नक्कीच चांगले दिवस येतील 

या वेळी प्रमुख उपस्थितीमध्ये  कोंढारभागाचे नेते माजी कृषी सभापती संजय पाटील भिमानगरकर, टेंभुर्णी चे युवा नेते रावसाहेब नाना देशमुख, टेंभुर्णी पंचायत समितीचे सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे, सरपंच प्रमोद कुटे, टाकळीचे चेअरमन भारत माने सर,भाई  शिवाजी पाटील चांदजकर, शिवाजी राजे कांबळे, भाजपाचे मा.ता.अध्यक्ष संजय दादा टोणपे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब ढवळे पाटील, मा. जी. प. सदस्य संजय डांगे, रयत क्रांतीचे प्रा. सुहास पाटील सर,  बबन भाऊ केचे, तांबवे टें चे माजी सरपंच राजाभाऊ खटके- पाटील, यशोदीप कॅम्पुटर चे संस्थापक अध्यक्ष  गोरख खटके सर, माढा तालुका शिवसेनाप्रमुख मधुकर आण्णा देशमुख, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य गणेश बापू केचे, तांबवे विकास सोसायटीचे माजी चेअरमन  संतोष खटके पाटील, सुभाष इंदलकर, निवृत्ती तांबवे, भैरवनाथ शुगरचे विजय खटके साहेब, गणेश  खटके -पाटील,   विलास काका देशमुख,  विजय भैय्या देशमुख, वैभव देशमुख, अशोक खटके, राहुल खटके, नितीन खटके पाटील, अॅड. मंगेश देशमुख, सोमनाथ कदम, डॉक्टर खटके, अर्जुन खटके सर, राहुल खटके, तांबवे टे गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य, विकास सेवा सोसायटी चे चेअरमन  व इतर मान्यवर, उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विलासराव दोलतडे यांनी केले तर आभार सुरज भगत यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा