*श्री भिमराव मोरे यांना विमा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर *
*लातूर प्रतिनिधी/ ज्ञानेश्वर सूर्यवंशी*. विमा क्षेत्रात जागतिक स्तरावर दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार MDRT- अमेरिका हा अत्यंत प्रतिष्ठित असा आंतरराष्ट्रीय पुरस्कार असून विमा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल सलग दुसऱ्या वर्षी श्री भिमराव मारोती मोरे यांना जाहीर झालेला आहे. जून 2023 मध्ये अमेरिका येथे होणाऱ्या MDRT- च्या जागतिक परिषदेमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मोरे यांचे मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील भंडारी हे असून ग्रामीण भागामध्ये घरोघर जाऊन विम्याचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य ते गेल्या सहा वर्षापासून औसा शहर व औसा तालुक्यात करत आहेत.
विनम्र व तत्पर सेवा हे त्यांचे ब्रीदवाक्य सोबत घेऊन ते आपल्या विमाधारकांना सेवा देण्यास कार्य करतात सखोल व्यावसायिक ज्ञान कठोर नैतिक आचरण व उत्कृष्ट ग्राहक सेवा हे त्यांच्या कार्यशैलीचे महत्त्वाचे पेलू आहेत याच्यामध्ये त्यांना विकास अधिकारी श्री विठ्ठल शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर मोरे यांनी एलआयसी चे सर्व अधिकारी कर्मचारी , माझ्या सर्व पॉलिसीधारकांचे व मित्र परिवाराचे तसेच माझ्या पाठीशी खंबीर पणे उभ्या असलेल्या कुटुंबाचे मन:पूर्वक आभार मानले आहेत उस्मानाबादच्या ग्रामीण भागापासून ते अमेरिकेच्या सर्वोच्च पुरस्कारापर्यंत त्यांनी घेतलेली गरुड झेप पाहून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा