Breaking

रविवार, १५ जानेवारी, २०२३

कारखान्याचे संचालक विष्णुपंत हुंबे यांचे सह चार व्यक्तीवर गंभीर गुन्हा दाखल.....


कारखान्याचे संचालक विष्णुपंत हुंबे यांचे सह चार व्यक्तीवर गंभीर गुन्हा दाखल.....


 बेंबळे। प्रतिनिधी/. मुकुंद रामदासी बेंबळे 

                   विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे बेंबळे येथील संचालक विष्णुपंत महादेव हुंबे यांचे सह इतर चार व्यक्तीवर टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून कट कारस्थान करणे, चिथावणी देणे, दमदाठी करणे ,जबर मारहाण करून गंभीर जखमी करणे, मूल्यवान वस्तू काढून घेणे या व इतर अनेक आरोपाविषयी त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान गुन्हा दाखल असलेल्यापैकी सूर्यकांत  दौंडे यांनी ही परस्परविरोधी  विजयकुमार ज्ञानेश्वर लोंढे यांचे सह इतर पाच व्यक्तीवर मारहाण करून पैसे मागणे व खंडणी वसूल करण्याचे आरोप करून गुन्हा दाखल केला आहे. सूर्यकांत दौंडे यांनी दत्तात्रय मच्छिंद्र लोंढे, हनुमंत मच्छिंद्र लोंढे, विजय ज्ञानेश्वर लोंढे, संतोष परमेश्वर लोंढे, विश्वजीत सौदागर लोंढे व पांडुरंग लोंढे यांच्यावर 11 जानेवारी 23 रोजी दमदाटी करणे व खंडणी स्वरूपात पैसे मागणे, मारहाण करणे अशा प्रकारचा गुन्हा टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे, तर 13 जानेवारी रोजी विजय ज्ञानेश्वर लोंढे यांनी सूर्यकांत दौंडे, विष्णूपंत महादेव हुंबे, अमोल दगडू पवार, नंदकुमार अरविंद रोमन व अक्षय अरविंद रोमन या सर्वांच्या विरुद्ध कटकारस्थान करणे, चिथावणी देणे, दमदाटी करणे व जबर मारहाण करून जखमी करणे, मूल्यवान वस्तू काढून घेणे या व अशा इतर प्रकारच्या आरोपाविषयी फिर्याद दाखल केली आहे. यातील दत्तात्रय मच्छिंद्र लोंढे यांनी सांगितलेला वृत्तांत असा की त्यांची व सूर्यकांत दौंडे यांची जमीन शेजारी असून दौंडे यांनी लोंढे यांना आपली जमीन माजी सरपंच कैलास भोसले यांच्या मध्यस्थीने विकली होती व त्यांचेच मध्यस्थीने लोंढे यांचे कडून काही लाख रुपये (ईसार) ऍडव्हान्स घेतला होता व मर्यादित कालावधीनंतर खरेदीखत करून देण्याचे दौंडे यांनी मान्य केले होते. परंतु मध्यंतरीच्या काळात दौंडे यांनी सदर जमीन दत्तात्रय फराडे यास परस्पर विकली व खरेदीखत करून पण दिले व त्याचे कडूनच पुन्हा मुक्त्यार म्हणून ही जमीन वहिवाटीसाठी स्वतःकडे घेतली व जमिनीच्या एका बाजूने अनेक वर्षापासून ऊस वाहतुकीसाठी असलेली वाट जेसीबीने खड्डा खणून अडवून टाकली. त्यामुळे कित्येक एकर गळीतासाठी कारखान्याकडे जाणारा ऊस वाटेअभावी तसाच सध्याही जागेवर उभा आहे. तू जमिन इतरांना विकली असली तरी आमचे घेतलेले पैसे परत दे असे लोंढे यांनी सांगितले असता दौंडे यांनी अँडवान्स मधील काही रक्कम लोंढे यांच्या बँक खात्यावर पाठवली आहे परंतु उर्वरित रक्कम देण्याविषयी लोंढे यांनी मागणी करतात लोंढे कुटुंबातील व्यक्तीवर दौंडे याने मारहाण व खंडणी वसुलीचा दावा दाखल केला.  यानंतर विजयकुमार लोंढे हा सदरचा खड्डा बुजवण्यास गेला असता त्यास दौंडे व इतरांनी जबर मारहाण केली, यामध्ये विजय लोंढे यांच्या छातीच्या बरगडीचे हाड मोडले आहे, त्याचे वर अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत, यामुळे विजय लोंढे यांनीही दौंडे सह मारहाण करणारे व चिथावणी देणाऱ्या संचालक विष्णू हुंबे यांचे सह इतर तीन व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
' दौंडे यांनी जमीन लोंढेंना विकली असता व ॲडव्हान्स घेतले असता पुन्हा दुसऱ्या व्यक्तीस जमीन विकणे, वाटेवर जेसीबीने खड्डे पाडणे व ऊस वाहतूक वाढवणे, खड्डा बुजवण्यासाठी 20 लाख रुपये मागणे ,भांडणे पेटवणे इत्यादी सर्व कारस्थाने, चिथावण्या देणे, घमेंडखोरी, दमदाट्या, दादागिरी हे सर्व प्रकार संचालक विष्णू हुंबे हाच करावयास लावतो व त्याला सर्व बाबतीत संरक्षण देतो असे यातील  सर्व लोंढे परिवाराचे म्हणणे आहे व यास अनेक ठोस पुरावे देखील गाव पातळीवर उपलब्ध आहेत असे त्यांचे मत आहे.

** संचालक हुंबेच्या कारस्थानामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू**** कैलास भोसले


 प्रशांत महादेव भोसले या माझ्या भावाच्या ट्रॅक्टरचा करार विष्णू हुंबे यांनी वेळेवर होऊ दिला नाही, कारखान्यातील वरिष्ठांनी अखेर एक महिना उशिरानंतर प्रशांत भोसले च्या ट्रॅक्टरचा करार करुन घेतला  परंतू पहिल्यापासूनचे मजूर प्रशांत कडून पैसे मिळण्यास उशीर झाल्यामुळे दुसरीकडे निघून गेले, त्यामुळे प्रशांत यास मध्य प्रदेश मध्ये मजूर टोळीसाठी जावे लागले व त्याच ठिकाणी त्याचा घात झाला, हा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेत देखील उपस्थित झाला हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे परंतु माझ्या भावाचा मात्र मृत्यू झाला. सूर्यकांत दौंडे यांनी अनेक वर्षापासून वाहतुकीसाठी असलेली वाटेवर जेसीबीने खड्डे  पाडणे ते बुजवण्यासाठी वीस लाख रुपये मागणे या धक्क्याने या ठिकाणी आडसाली पाच एकर उसाचे मालक भिकाजी वांगदरे यांना हृदयविकाराचा झटका आला व पुढील उपचाराचे आतच त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना संचालक विष्णू हुंबे याचेच कटकारस्थान कारणीभूत असल्याचा स्पष्ट आरोप बेंबळे चे माजी सरपंच कैलास भोसले यांनी केला आहे.

... सत्यता पडताळून पुढील कारवाई करणार..

           पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर दरम्यान सूर्यकांत दौंडे व विजयकुमार लोंढे यांच्या परस्पर तक्रारीची सत्यता पडताळून आम्ही पुढील कारवाई निश्चित करणार असल्याचे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा